8 ऑगस्टपासून ‘परे’वरील 8 नवीन एसी लोकल फेऱ्या धावणार

पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेच्या एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने एसी लोकलच्या तिकीटांचे दर कमी केल्यापासून प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे.

mumbai ac local service increases eight rounds on western railway

पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेच्या एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने एसी लोकलच्या तिकीटांचे दर कमी केल्यापासून प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे आता प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेता पश्चिम रेल्वेने सोमवारपासून म्हणजेच 8 ऑगस्टपासून 8 नवीन अतिरिक्त एसी लोकल फऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. (New 8 ac local run on western railway from 8 august)

एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ केल्याने आता पश्चिम रेल्वेवर एसी लोकल फेऱ्यांची संख्या 40 वरून 48 पर्यंत वाढली आहे. काही महिन्यांपूर्वी एसी लोकलच्या तिकीट दरात 50 टक्के कपात करण्यात आली. त्यानंतर, पश्चिम रेल्वेवरील एसी लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद चांगाल मिळत आहे.

पश्चिम रेल्वेने याआधीही एसी लोकल फेऱ्यांची संख्या वाढवली होती. त्यानंतर आता पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात एक नवीन एसी लोकल दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आणखी एसी लोकल फेऱ्या वाढविण्याचा निर्णय रेल्वेने घेतला असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावरील या 8 नवीन अतिरिक्त एसी लोकल फेऱ्यांपैकी 4 डाऊन दिशेने आणि 4 अप दिशेने धावणार आहेत. अपच्या दिशेने विरार-चर्चगेट, बोरिवली-चर्चगेट, मालाड-चर्चगेट आणि भाईंदर-चर्चगेट या मार्गावर प्रत्येकी एक सेवा आहे. त्याचप्रमाणे डाऊन दिशेने चर्चगेट-विरार, चर्चगेट-बोरिवली, चर्चगेट-मालाड आणि चर्चगेट-भाईंदरदरम्यान प्रत्येकी एक सेवा आहे.

एसी लोकलचे अप मार्गवरील वेळापत्रक

  • विरार-चर्चगेट जलद लोकल सकाळी 7:30 वाजता
  • बोरिवली-चर्चगेट जलद लोकल सकाळी 9:48 वाजता
  • मालाड-चर्चगेट जलद लोकल सायंकाळी 5:52 वाजता
  • भाईंदर-चर्चगेट धीमी लोकल रात्री 7:52 वाजता

एसी लोकलचे डाऊन मार्गवरील वेळापत्रक

  • चर्चगेट-विरार जलद लोकल सकाळी 7:22 वाजता
  • चर्चगेट-बोरिवली जलद लोकल सकाळी 9:44 वाजता
  • चर्चगेट-मालाड जलद लोकल सकाळी 11:48 वाजता
  • चर्चगेट-भाईंदर जलद लोकल रात्री 7:42 वाजता

हेही वाचा – मेट्रोचा प्रवास आता रात्री उशिरापर्यंत; शेवटची गाडी सुटणार पावणे बारा वाजता