घरCORONA UPDATEचितांजनक; धारावीत एकाच दिवसात ९६ कोरोनाचे नवीन रुग्ण

चितांजनक; धारावीत एकाच दिवसात ९६ कोरोनाचे नवीन रुग्ण

Subscribe

धारावीमध्ये कोरोना रुग्णांच्या निर्देशांक वाढतच असून शनिवारी धारावीत ८७ रुग्ण आढळून आल्यानंतर रविवारीच याच धारावीत तब्बत ९४ रुग्ण आढळून आहे. शनिवारी आणि त्यापाठोपाठ रविवारी आढळून आलेली ही आजवरच्या एका दिवसातील सर्वांत मोठी संख्या आहे. तर दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यामुळे मृत्यू झालेल्या करोना रुग्णांची संख्या धारावीत २० वर पोहोचली आहे.

मुंबई महापालिकेच्या जी-उत्तर विभागातील एकट्या धारावी परिसरामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या एकूण ५९० वर पोहोचली आहे. धारावी-माटुंगा लेबर कॅम्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वस्तीत ११ रुग्ण आढळून आले, तर त्याखालोखाला वाल्मिकी नगर १० रुग्ण आढळून आले आहे. इंदिरा नगर, ९०फुटी रस्ता, क्रॉस रोड आणि नर्सिंग चाळ आदी ठिकाणी प्रत्येकी ८रुग्ण आढळून आले आहेत. तर मुकुंद नगरमध्ये ४ तर मुस्लिम नगर, धारावी पीसी, आझाद नगर आदी वस्तींमध्ये प्रत्येकी ३ रुग्ण सापडले आहेत. याशिवायशाहू नगर,विजय नगर,कमला नेहरु नगर, शिवशक्ती नगर, संजय चाळीत प्रत्येकी दोन तर पीएमजीपी नगर, सिध्दीविनायक सोसायटी, कुट्टीवाडी, नवी नगर, शक्ती चाळ,टाटा कॉलोनी, बसवेश्वर नगर, ट्रान्सिट कॅम्प, संगम गल्ली, एचपी नगर, सोशल नगर, हिरणदास चाळ, आगास वाडी, नाईक नगर, अजमेरा चाळ, कुंचिकुरवे नगर,मिलिंद नगर, फातिमा चाळ, भारतीय चाळ, पिवळा बंगला, अन्ना नगर आदी वस्तींमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. दिवसभरात अन्ना नगरमधील एक अन्य ठिकाणी एक याप्रमाणे दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचा आकडा २० वर पोहोचला आहे.

- Advertisement -

दादर आणि माहिममध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू

माहिम परिसरात दिवसभरात १६ कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून त्यामध्ये एकाच्या मृत्यूचा सामावेश आहे. माहिमपरिसरातील बाह्मणदेव चाळ आणि पोलिस कॉलनीत प्रत्येकी चार कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. शिवाय माहिम कॉजवेला दोन, तर कापड बाजार, मच्छिमार कॉलनी, देव आरती अपार्टमेंट, नुरानी इमारत, ग्रॅबियल रोड, नया नगर आदी ठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण आढळून आले असून त्यामुळे माहिममधील एकूण रुग्णांची संख्या ६८ वर पोहोचली आहे. बाह्मणदेव चाळीत एका मृत्यू झाल्याने या परिसरातील मृतांचा आकडा दोन वर पोहोचला आहे. तर दादर परिसरात दिवसभरात ४ नवीन रुग्ण आढळून आले येथील रुग्णांची एकूण संख्या ५० वर पोहोचली आहे. पश्चिम अपार्टमेंट, अहमद शेखर कंपाऊंड, वरखाना भवन कबुतर खाना, शिवाजीपार्क रामदास भवन आदी ठिकाणी रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये एकाचा मृत्यूचा आहे. त्यामुळे दादरमधील करोनाग्रस्तांच्या मृत्यूचा आकडा ४ एवढा झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -