घरCORONA UPDATECorona Update: दिलासादायक! मुंबईतील नव्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येत घट!

Corona Update: दिलासादायक! मुंबईतील नव्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येत घट!

Subscribe

देशात आणि राज्यात कोरोनाबाधितांची संख्येत गेल्या काही दिवसांमध्ये वाढताना दिसत आहे. मात्र दुसऱ्याबाजूला देशातील कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या मुंबईत नव्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहेत. मुंबईत २४ तासांत हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत होते. पण आता हजार पेक्षा कमी नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. गेल्या २४ तासांत मुंबईत ७१७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५५ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या १ लाख १० हजार ८४६वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत ६ हजार १८४ मृत्यू झाला आहे. तसेच मुंबईत २४ तासांत २ हजार ४६७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ८४ हजार ४११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -

सध्या मुंबईत २० हजार २५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज झालेल्या मृतांमध्ये ४२ रुग्णांचा काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील ३८ रुग्ण पुरुष आणि १७ रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी २ जणांचे वय ४० वर्षा खाली होते, ३५ जणांचे वय ६० वर्षावर होते तर उर्वरित १८ रुग्ण ४० ते ६० वर्षा दरम्यान होते.

मुंबईत कोरोनाचे ७४१ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या ७८ हजार ३३७वर पोहोचली आहे. मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६ टक्के एवढे झाले आहे. २७ जुलैपर्यंत ४ लाख ९४ हजार ३३९ कोविड चाचण्या झाल्या आहेत. तसेच मुंबईतील दुप्पटीचा दर ६९ दिवस आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Corona Update: राज्यात सलग दुसऱ्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त संख्या अधिक!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -