घरताज्या घडामोडीCoronavirus: नायर डेंटल हॉस्पिटलमध्ये आणखी एक कोविड वॉर्ड

Coronavirus: नायर डेंटल हॉस्पिटलमध्ये आणखी एक कोविड वॉर्ड

Subscribe

पालिकेच्या नायर डेंटल हॉस्पिटलने कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष कोविड वॉर्ड सुरू करून देशामध्ये पहिले डेंटल हॉस्पिटलमध्ये कोविड वॉर्ड सुरू करण्याचा मान मिळवला होता. कर्मचाऱ्यांपाठोपाठ डॉक्टर आणि आता सर्वसामान्यांसाठी तब्बल ३० खाटांचे आणखी एक वॉर्ड नायर डेंटल हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात येणार आहे.

मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची सेवा करणारे कर्मचारी आणि डॉक्टर यांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढल्यानंतर नायर डेंटल हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांसाठी २० खाटांचे कोरोना वॉर्ड सुरू केले. त्यानंतर डॉक्टरांसाठी १५ खाटांचे आणखी एक वार्ड सुरू करण्यात आले. हे दोन्ही वॉर्ड सुरू केल्यानंतर कोरोना रुग्णांची सेवा करताना लागण झालेले कर्मचारी आणि डॉक्टर यांना चांगल्या प्रकारे उपचार मिळण्यास मदत झाली. मात्र सध्या मुंबईतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि नायर हॉस्पिटलवर येणार ताण लक्षात घेता डेंटल हॉस्पिटलने कोरोना रुग्णांसाठी आणखी एक ३० खाटांचे कोरोना वॉर्ड सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या वॉर्डमध्ये गंभीर नसलेले व ज्यांना व्हेंटिलेटर, ऑक्सिजन किंवा आयसीयूची गरज लागणार नाही अशा रुग्णांना ठेवण्यात येणार आहे. हे रुग्ण नायर हॉस्पिटलमधून पाठवण्यात येणाऱ्या रुग्णांनाच दाखल करून घेण्यात येणार आहे. या वॉर्डचे काम अंतिम टप्प्यात असून पुढील दोन ते तीन दिवसात हा वॉर्ड सुरू होण्याची शक्यता आहे. या वॉर्डमुळे नायर हॉस्पिटलमध्ये वाढत्या रुग्ण संख्येला सामावून घेण्यास मदत होईल, अशी माहिती नायर डेंटल कॉलेजचे दात भरण्याचे आणि वाचवणाऱ्या विभागाचे प्रमुख डॉ. कुलविंदर सिंग बांगा यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -