घरताज्या घडामोडीफेरीवाल्यांनीच त्रासले केडीएमसीचे नवे आयुक्त 

फेरीवाल्यांनीच त्रासले केडीएमसीचे नवे आयुक्त 

Subscribe

 स्कायवॉकवरील फेरीवाल्यांची आयुक्तांकडून अचानक पाहणी ...

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नवीन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बुधवारी रात्री अचानक  कल्याण, डोंबिवली स्टेशनला लागून असलेल्या स्कायवॉकची पाहणी दौरा केला. फेरीवाल्यांमुळे नागरिकांना काय आणि किती त्रास होतो याचा अनुभव घेतला. या सरप्राईज दौऱ्यानंतर आयुक्तांनी अधिकाऱ्यांना एका तासाच्या आत या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करणार असल्याचंही आयुक्तांनी स्पष्ट केलय.
स्टेशन परिसरात, स्कायवॉकवर बसलेल्या फेरीवाल्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. रस्त्यात जागा अडवून फेरीवाल्यांचा बाजार भरत असल्याने प्रवाशांना विशेषत: महिलांना गर्दीचा सामना करावा लागतो. फेरीवाल्यांच्या विळख्यातून कसाबसा मार्ग काढावा लागत असतो. त्यामुळे नागरिक खूपच त्रस्त आहेत. फेरीवाल्यासंदर्भातची तक्रार नागरिकांनी आयुक्तांकडे केली होती. त्याची दखल घेत आयुक्तांनी कोणत्याही अधिकाराला न सांगताच स्टेशन परिसरातील स्कायवॉक गाठले. स्कायवॉकवरून चालताना नागरिकांना फेरीवाल्यांमुळे किती त्रास होतो हे आयुक्तांनी स्वतः अनुभवले.
आयुक्त सूर्यवंशी यांनी कल्याण तसेच डोंबिवली स्टेशनला लागून असलेल्या स्कायवॉकची पाहणी केली. या पाहणीदरम्यान विशेषकरुन डोंबिवली स्टेशनच्या स्कायवॉकवर सर्रासपणे फेरीवाले बसलेले त्यांच्या निदर्शनास आले. फेरीवाल्यांमुळे स्कायवॉकवरुन नागरिकांना चालणेही कठीण होत असल्याचं आयुक्तांच्या लक्षात आलं. आयुक्तांनी स्वत: धक्के खात या स्कायवॉकची पाहणी केली. आयुक्त सूर्यवंशी यांनी या परिस्थितीचा आढावा घेतल्यांनतर तेथूनच अधिका-यांना फोन लावून एका तासाच्या आत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. आयुक्तांच्या फोननंतर अधिका-यांची चांगलीच धावपळ उडाली. मात्र या प्रकरणी जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असेही  आयुक्त सूर्यवंशी यांनी स्पष्ट केलय त्यामुळे पालिका अधिका-यांचे धाबे दणाणले आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -