शिंदे गटातील नव्या मंत्र्यांची बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट; पदभार स्वीकारण्यापूर्वी घेतले आशीर्वाद

तब्बल महिन्याभराच्या मोठ्या काळानंतर आखेल मंगळवारी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. भाजप आणि शिंदे(bjp - shinde) गटातील प्रत्येकी नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली. शपथविधी झाल्यानांतर आता कोणाला कोणते खाते मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

मागील अनेक दिवसांपासून राखडलेला राज्यमंत्रिमंडळाचा अखेर विस्तार झाला. राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर शिंदे गटातील शपथ घेततेले सर्व मंत्री शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे(balasaheb thackeray) यांच्या स्मृती स्थळावर आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचले. याच संदर्भांत आमदारांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी सर्व आमदार म्हणाले, मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पदभार स्वीकारण्यापूर्वी आणि कमला सुरुवात करण्यापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सर्व जण बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर आलो आहोत असं उपस्थित आमदारांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

तब्बल महिन्याभराच्या मोठ्या काळानंतर आखेल मंगळवारी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. भाजप आणि शिंदे(bjp – shinde) गटातील प्रत्येकी नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली. शपथविधी झाल्यानांतर आता कोणाला कोणते खाते मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

हे ही वाचा – पावसाळी अधिवेशनाचा कार्यक्रम जाहीर, जाणून घ्या कसे होणार कामकाज?

दरम्यान या सगळ्या संदर्भात शंभूराजे देसाई(shambhuraje desai) यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. ”शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आमच्या हृदयात आहेत. शपथ घेताना लिहून दिलं आहे त्याप्रमाणेच वाचावं अशी सूचना असल्याने बाळासाहेबांचं नाव घेतलं नव्हतं. पण ते आमच्या मनात आणि हृदयात आहेत’. त्याचबरोबर ‘बाळासाहेबांची शिकवण आहे त्याप्रमाणे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण याच आम्ही अवलंब करू’. असं दादा भुसे(dada bhuse) यांनी सांगितले.

हे ही वाचा – शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मुंबईकर मराठी चेहरा दिसत नाही!

शंभूराजे देसाई आणि दादा भुसे यांच्या प्रमाणे गुलाबराव पाटील(gulabrao patil) यांनी सुद्धा प्रतिक्रिया देताना सांगितले, ‘ज्या बाळासाहेबांच्या आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो आहोत. त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठीच आम्ही आज इथे आलो आहोत. बाळासाहेब आमचं ऊर्जास्रोत आहेत’. असं गुलाबराव पाटील म्हणाले. दरम्यान गेल्या महिन्याभरापासून लांबणीवर गेलेला राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला. या शपथविशीत पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजप कडून प्रत्येकी नऊ आशय एकूण अठरा मंत्रयांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.

शिंदे गटाकडून नाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. तर भाजपाकडून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित, मंगलप्रभात लोढा यांना संधी देण्यात आली आहे.

हे ही वाचा – राजकारणात कोणीच कायमचा संपत नसतो, शिवसेनेचे भाजपावर शरसंधान