घरमुंबईनवी मुंबईकरांसाठी 'गुड न्यूज'; पिण्याच्या पाण्यात होणार वाढ ...

नवी मुंबईकरांसाठी ‘गुड न्यूज’; पिण्याच्या पाण्यात होणार वाढ …

Subscribe

औद्योगिक कामे व वापरासाठी प्रक्रिया करण्यात आलेले सांडपाणी उपलब्ध करवून देणारी नवी मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्र राज्यातील पहिली महानगरपालिका असणार आहे.

नवी मुंबईकरांना धरणातील पिण्याचे पाणी अधिक प्रमाणात उपलब्ध व्हावे आणि त्याचवेळी उद्योगधंदे-कारखान्यांनाही मुबलक पाणी कमी दरात उपलब्ध व्हावे, यासाठी आखण्यात आलेल्या ३९८ कोटी रुपयांच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम नवी मुंबई महापालिकेने टेक्टोन इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन इंडिया (प्रायव्हेट) लिमिटेड व ईगल इन्फ्रा इंडिया लिमिटेड यांच्याकडे सोपविले आहे. यामुळे लवकरच कोपरखैरणे व ऐरोली येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांमधून येणारे प्रत्येकी २० एमएलडी असे एकूण ४० एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते उद्योगधंदे व कारखान्यांना स्पर्धात्मक किमतींना पुरविणे शक्य होणार आहे.

याविषयी अधिक माहिती देताना नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त रामास्वामी एन यांनी सांगितले की, “या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पामुळे पिण्याच्या पाण्याची बचत होणार आहे. प्रक्रिया केलेले पाणी हे ताज्या पाण्याइतकेच स्वच्छ असेल आणि मुख्य म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया किंमतीच्या दृष्टीने किफायतशीर असेल. पुढील १८ महिन्यांमध्ये हा प्रकल्प पूर्णत्वास जाईल.”

- Advertisement -

म्हणून वाढणार पिण्याचे पाणी

टेक्टोन ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक एस. लक्ष्मणन यांनी सांगितले, “औद्योगिक कामे व वापरासाठी प्रक्रिया करण्यात आलेले सांडपाणी उपलब्ध करवून देणारी नवी मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्र राज्यातील पहिली महानगरपालिका आहे. या प्रकल्पामध्ये पम्पिंग स्टेशन, अल्ट्रा-फिल्ट्रेशन तंत्रज्ञान, प्रक्रिया करण्यात आलेल्या पाण्यासाठी ८३ किमीची पाईपलाईन व १५ वर्षे प्रकल्प संचालन व देखरेखीचा समावेश आहे.” प्रक्रिया करण्यात आलेले उच्च दर्जाचे पाणी हे एमआयडीसीच्या औद्योगिक उत्पादन कामांसाठी बारवी धरणातून मिळालेल्या प्रक्रिया करण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याइतकेच चांगले व उपयुक्त असेल. हा प्रकल्प यशस्वीरीत्या सुरु झाल्यानंतर सध्या औद्योगिक कामांसाठी वापरण्यात येणाऱ्या धरणाच्या पाण्याचे प्रमाण खूपच कमी होईल. साहजिकच, शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी जास्त प्रमाणात उपलब्ध होईल, असंही एस. लक्ष्मणन यांनी सांगितलं.

- Advertisement -

या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च १५० कोटी रुपये भांडवली खर्च व २४८ कोटी रुपये प्रकल्पाचे संचालन व देखभालीसाठी असा विभागण्यात आला आहे. यातील ५०% भांडवली गुंतवणूक “अमृत” (केंद्र व राज्य सरकारचे अभियान) मधून केली जाईल व ५०% गुंतवणूक नवी मुंबई महानगरपालिका करेल. संचालन व देखभालीचा खर्च एमआयडीसीकडून मिळणाऱ्या पाणी शुल्कातून केला जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -