घरताज्या घडामोडीमध्य रेल्वेचे नविन वेळापत्रक शनिवारपासून लागू

मध्य रेल्वेचे नविन वेळापत्रक शनिवारपासून लागू

Subscribe

मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर येत्या शनिवार नविन वेळापत्रक लागु होणार आहे. या वेळापत्रकात एकाही नविन
फेरीचा समावेश करण्यात आला नसला तरीे लोकलच्या ४२ फेर्‍यांच्या वेळात बदल करण्यात आलेला आहे.त्यामुळे वेळापत्रक सुधारण्यास मदत होणार आहे.तसेच पश्चिम रेल्वे लोकलच्या संख्येत ३ ने वाढ करण्यात आल्यामुळे पश्चिम रेल्वेची लोकलची संख्या आता ३८ झालेली आहे.त्यामुळे प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

मध्य रेल्ेववर दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात नविन वेळापत्रकलागु करण्यात येते.यंदा वेळापत्रकास काहीसा विलंब झालेला आहे. या नविन वेळापत्रकात लोकलच्या फेर्‍या वाढविण्यावर भर न देता लोकलच्या वेळात बदलकरुन वेळापत्रकाचा वक्तशीरपणा सुधारण्यावर विशेष भर देण्यात आलेला आहे. वेळात बदलण्यात आलेल्या लोकलमध्ये खासकरुन कल्याण,कर्जत,टिटवाळा, खोपाली,ठाणे लोकलचा समावेश असल्यामुळे या स्थानकातील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.अनेक लोकलच्या गंतव्य स्थानात देखील बदल करण्यात आलेला आहे.सकाळी ११.४२ ची सीएसएमटी -कल्याण लोकल आता सकाळी ११.४२ वाजता पश्चिम रेल्वे स्थानकातुन कल्याणकरिता सुटणार आहे. बदलापुर-सीएसएमटी रात्री ९ची लोकल आता रात्री ९ वाजून ८ मिनिटांनी निघणार आहे.

- Advertisement -

ठाणे-कर्जत सकाळी १०.४८ ची लोकल सीएसएंमटी स्थानकातुन सकाळी १० वाजता सुटणार आहे. बदलापुर-सीएसएमटी दुपारी.१२.२२ ची लोकल आता दु.१२.२०ला धावणार आहे. कर्जत-ठाणे दु.१२.२१ची लोकल दुपारी १२.२३वाजता,अबंरनाथ-सीएसएमटी रात्री.९.१५ ची लोकल रात्री ९वाजून ७ मिनिटांनी सुटणार आहेत. याशिवाय संध्या.६.४८ ची लोकल कल्याण-दादर,स.९.५४ची टिटवाळा-ठाणेलोकल, स.११.१७ची कल्याण-दादर लोकल परेल
स्थानकापर्यत चालविण्यात येणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -