Sunday, June 13, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई बाल कर्करुग्णांच्या उपचारासाठी टाटा मेमोरिअलचे नवे उपचार केंद्रे

बाल कर्करुग्णांच्या उपचारासाठी टाटा मेमोरिअलचे नवे उपचार केंद्रे

टाटा मेमोरिअल हॉस्पिटल प्रशासनाने बालकर्करोग विभागाचा विस्तार करत गुवाहाटी, वाराणसी आणि विशाखापट्टणम येथे उपचाराचे नवे विभाग सुरू केले आहेत.

Related Story

- Advertisement -

देशभरातील कर्करुग्ण उपचारांसाठी मुंबईकडे धाव घेत परळ येथील टाटा मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये दाखल होतात. त्यामुळे, मुंबईतील टाटा हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांचा भार दिवसेंदिवस वाढत आहे. याचा विचार करता टाटा मेमोरिअल हॉस्पिटल प्रशासनाने बालकर्करोग विभागाचा विस्तार करत गुवाहाटी, वाराणसी आणि विशाखापट्टणम येथे उपचाराचे नवे विभाग सुरू करण्यात आले असल्याची माहिती बुधवारी देण्यात आली आहे.

हजारो बाल कर्करोग रुग्ण घेत आहेत उपचार

टाटा मेमोरिअल इम्पॅक्ट फाऊंडेशनच्या मदतीने उपचार केंद्रांचा विस्तार करण्यात आला आहे. या तिन्ही केंद्रावर सुमारे हजारो बाल कर्करोग रुग्ण उपचार घेत आहेत. या तिन्ही केंद्रावर कर्करोगाच्या निदान, उपचार, सुमपदेशनाची सेवाही देण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. हे सर्व उपचार परवडणाऱ्या दरांमध्ये देण्यात येणार आहेत, अशी माहिती टाटा मेमोरिअल हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

बालकर्करोगावर वेळीच निदान होणे गरजेचे असून नंतरच्या टप्प्यात वेगवेगळ्या शाखेतील औषधोपचारांचा समावेश उपचारप्रक्रियेत करण्यात येतो. यात आहार, समुपदेशन, शारिरीक स्वास्थ यांचा समावेश आहे. बालकर्करोगाच्या समस्येचे उच्चाटन करण्यासाठी देशभरात अनेक विभाग स्थापन करण्याची गरज आहे. यासाठी टाटा मेमोरिअल ही संस्था भविष्यातही प्रयत्नशील राहील.  – डॉ. श्रीपाद बनावली; टाटा मेमोरिअलचे अकॅडमिक संचालक

या तिन्ही विभागांच्या माध्यमातून बालकर्करोग रुग्णांना स्थानिक पातळीवर दर्जात्मक सेवा घेणे सोपे जाईल. लवकरच पंजाब येथील मुल्लानपूर येथेही अशा स्वरुपाचा विभाग सुरू होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. इम्पॅक्ट फाउंडेशनच्या सचिव शालिनी जटीया या मुंबईतील टाटा मेमोरिअलसह गेली अनेक वर्ष काम करत असल्याने याचा विस्तार करण्याचे ठरवले असून त्या विचारातून येथील मॉडेलसह नवे विभाग सुरु केले आहेत. यामुळे तेथील स्थानिक बालकर्करुग्णांना फायदा होणार आहे.  – डॉ. गिरीश चिन्नास्वामी; बालकर्करोग ऑन्कॉलॉजी विभागाचे प्रमुख


- Advertisement -

हेही वाचा – अजब! दोन समलैगिंक मातांच्या पोटी वाढला एकचं गर्भ!


- Advertisement -