घरमुंबईअमेरिकेचे मुंबईचे वाणिज्यदूत माईक हँकी यांनी घेतली राज्यपालांची भेट

अमेरिकेचे मुंबईचे वाणिज्यदूत माईक हँकी यांनी घेतली राज्यपालांची भेट

Subscribe

मुंबई – अमेरिकेचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत माईक हँकी यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेतली.

यावेळी माईक हँकी यांनी अमेरिका – भारत द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यासाठी आपल्या योजना व प्राधान्यक्रम याबाबत राज्यपालांना माहिती दिली. गेल्यावर्षी भारतातून अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी 62000 विद्यार्थी गेले होते. हे सर्व विद्यार्थी अमेरिकेचे सदिच्छा राजदूत आहेत, असे सांगून भारतातून अमेरिकेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पुढील वर्षी आणखी एक लाखांनी वाढविण्याचे आपले उद्दिष्ट असल्याचे वाणिज्यदूतांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

बैठकीला राजकीय व आर्थिक सल्लागार क्रिस्टॉफर ब्राऊन तसेच अमेरिकेच्या मुंबई वाणिज्यदूतावासातील राजकीय सल्लागार प्रियांका विसारिया – नायक उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -