घरताज्या घडामोडीमुंबईत नववर्षाचा जल्लोष; प्रदूषणामध्ये वाढ

मुंबईत नववर्षाचा जल्लोष; प्रदूषणामध्ये वाढ

Subscribe

मुंबईकरांनी नववर्षाचं स्वागत धामधूमित केलं. पण, त्याच रात्री मुंबईकरांनी आतिषबाजीने केलेल्या स्वागतामुळे पुन्हा एकदा मुंबईत प्रदूषणामध्ये वाढ झाली आहे.

मुंबईकरांनी नववर्षाचं स्वागत धामधूमित केलं. पण, त्याच रात्री आणि नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मुंबईकरांनी आतिषबाजीने केलेल्या स्वागतामुळे पुन्हा एकदा मुंबईच्या हवेचा आणि प्रदूषणाचा प्रश्न समोर आला आहे. नववर्षाचे स्वागत करताना केलेल्या अतिषबाजीतून पीएम २.५ च्या पुढे प्रदूषकांचा निर्देशांक वाढला असल्याचा अहवाल आवाज फाऊंडेशनकडून देण्यात आला आहे. प्रदूषकांच्या निर्देशकांचे प्रमाण १ जानेवारी पहाटे ४.३० ते सकाळी सव्वा सात दरम्यान सर्वाधिक असल्याची नोंद करण्यात आली.

आतिषबाजीमुळे प्रदूषणामध्ये वाढ

मुंबईत दोन दिवसापांसून थंडी पडल्यामुळे मुंबईकर सध्या उत्साहात आहेत. त्यात मुंबईकरांनी नववर्षाच्या स्वागतासाठी जल्लोषाने केलेल्या आतिषबाजीमुळे प्रदुषकांमध्ये वाढ झाल्याची नोंद झाली. ३१ डिसेंबरच्या सकाळी ११.३० पासून १ जानेवारी ११.३० पर्यंत वांद्रे पश्चिम आणि पालीहील या ठिकाणी पीएम२.५ चा निर्देशांक मोजण्यात आला. रात्री ९ वाजता ६५.७१ एवढा निर्देशांक होता. पण, मध्यरात्र उलटल्यावर पीएम २.५ चा निर्देशांकात वाढ होताना दिसून आली. यामुळे वातावरणात प्रदुषकांचे प्रमाण वाढले होते. पालीहील निवासी परिसरातही प्रदुषके पसरली होती. सकाळी ९ नंतर प्रदुषकांचे प्रमाण हळूहळू कमी होऊ लागले असल्याचंही आवाज फाऊंडेशनच्या सुमेरा अब्दुलअली यांनी सांगितले. प्रदुषकांची नोंदणी अर्बन सायन्सच्या नकुल मेहता यांनी केली.

- Advertisement -

पीएम २.५ प्रदूषकांनी वाढला निर्देशांक

तारिख           वेळ                         प्रमाण
३१ डिसेंबर      रात्री ९                      ६५.७१
७२.६१

१ जाने      १.३० (मध्यरात्री)                ११०.३८
३.१५ १२०.८३
४.३० १५१.८९
७.१५ १५८.८९
९.०० १६६.५७
११.३० १००.१८

- Advertisement -

हेही वाचा – भटक्या मांजरांच्या निर्बिजीकरणाला जानेवारीपासून सुरुवात


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -