घरताज्या घडामोडीपुढील तीन दिवस मान्सून सक्रिय राहाणार; वाचा, तुमच्या भागात कसा असणार पाऊस

पुढील तीन दिवस मान्सून सक्रिय राहाणार; वाचा, तुमच्या भागात कसा असणार पाऊस

Subscribe

मुंबई – शुक्रवार रात्रीपासून विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यात अनेक भागात मान्सून अतिसक्रिय झाला आहे. त्यामुळे नागपूरमध्ये ढगफुटी सदृष्य पाऊस झाला आहे.
राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात पुढील तीन दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

नागपूरमध्ये शुक्रवारी रात्री दोन ते पहाटे पाचपर्यंत प्रचंड पाऊस झाला. ढगफुटी सदृष्य परिस्थिती नागपूरमध्ये निर्माण झाली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, रात्री झालेल्या पावसात एका आजींचा मृत्यू झाला आहे. उपमुख्यमंत्री सायंकाळी नागपूरला जाणार आहे. कोणीही अफवा पसरवू नये आणि अफवांवर विश्वासही ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

- Advertisement -

राज्यात मान्सून अतिसक्रिय असल्यामुळे अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रविवारपासून 29 सप्टेंबरपर्यंत कोकण आणि गोव्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

- Advertisement -

24 आणि 25 सप्टेंबर रोजी मान्सून असणार आहे. तर 26 सप्टेंबरनंतर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि अरबी सुमद्रावर एक सिस्टीम तयार होण्याची शक्यता आहे. त्या सिस्टीमच्या प्रभावामुळे 26 सप्टेंबरपासून मान्सून राज्यात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. आज संपूर्ण राज्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

हेही वाचा : PHOTO : नागपूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती; आतापर्यंत 500 लोकांची सुटका

पावसामध्ये कोणीही गरज नसताना बाहेर पडू नये, असे आवाहान प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नागपूरमधील पुरस्थितीत आता निवळत आली आहे. मात्र पुढील तीन दिवसांत होणाऱ्या मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आदेश दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -