घरताज्या घडामोडी'अनधिकृत बांधकामाच्या तोडकामाचा खर्च कंगना कडून वसूल करा'

‘अनधिकृत बांधकामाच्या तोडकामाचा खर्च कंगना कडून वसूल करा’

Subscribe

कंगना रनौतच्या कार्यालयाच्या तसेच निवासस्थानाच्या अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेच्यावतीने कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी महापालिकेचे मनुष्यबळ आणि यंत्र सामुग्री वापरण्यात आली. त्यामुळे या तोडकामासाठी आलेला खर्च कंगना रनौतकडून वसूल करण्याची मागणी होत आहे. रनौतच्या पाली हिलमधील चेतक बंगल्यातील वाढीव अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या एच / पश्चिम विभागाने कारवाई केली. तिच्या बंगल्याच्या बाहेरील बाजूला बुलडोझर चढवत बांधकाम तोडून टाकले. अंतर्गत भागातील बांधकामांवरही हातोडा चालवला. मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईनंतर वेगवेगळ्या स्तरावरून प्रशासनावर टीकाटिप्पणी होऊ लागलेली असतानाच वाचडॉग फाऊंडेशनने या कारवाईसाठी झालेला खर्च महापालिकेने कंगनाकडून वसूल करण्यात, यावा अशी मागणी केली आहे.

शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यावर बाहेर रस्त्यावर अनधिकृत बांधलेला रॅम्प मुंबई महापालिकेच्या एच/ पश्चिम विभागाने तोडला त्यानंतर वाचडॉग फाऊंडेशनने तत्कालीन महापलिका आयुक्त सीताराम कुंटे यांना निवेदन देऊन या तोडकामावर झालेला खर्च वसुल करण्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रशासनाने शाहरुख खान यांच्याकडून १ लाख ९३ हजार एवढी रक्कम वसूल केली होती. त्याच नियमाच्या आधारे प्रशासनाने रनौत यांच्याकडूनही तोडकामासाठी झालेला खर्च वसूल करण्याची मागणी वाचडॉग फाऊंडेशनचे विश्वस्त गॉडफ्री पिमेंटा यांनी महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याकडे केली आहे.

- Advertisement -

दरम्यान कंगनाने मुंबई महापालिकेच्या विरोधात दोन कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे. हायकोर्टात याचिका दाखल करत आपल्या कार्यालयाच्या तोडफोडीबद्दल नुकसान भरपाई द्यावी, असा दावा कंगनाने या याचिकेच्या माध्यमातून केला आहे. मुंबई महापालिकेने तोडकाम करत असताना कार्यालयातील दुर्मिळ वस्तू, सामानाचे नुकसान केले असल्याचा आरोप कंगनाने लावला आहे. मुंबई हाकोर्टाने १७ सप्टेंबर रोजी महापालिकेला भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -