Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Mansukh Hiren Murder case : हत्येच्या कटात प्रदीप शर्मांचा सहभाग ? NIA...

Mansukh Hiren Murder case : हत्येच्या कटात प्रदीप शर्मांचा सहभाग ? NIA चौकशीला हजर

NIA enquiry : परमबीर सिंह आऊट, प्रदीप शर्मा इन

Related Story

- Advertisement -

मनसुख हिरेन हत्या आणि उद्योगपती मुकेश अंबानीच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओतील स्फोटकांप्रकरणी आज पोलिस अधिकाऱ्यांच्या चौकशीला नॅशनल इनवेस्टीगेशन एजन्सीने सुरूवात केली. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह हे आज बुधवारी सकाळी एनआयए मुख्यालयात सकाळी ९.३० च्या सुमारास हजर झाले. त्यापाठोपाठच दुपारी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा हे आज बुधवारी नॅशनल इनवेस्टिगेशन एजन्सी (एनआयए) चे मुख्यालयात हजर झाले. मनसुख हिरेन हत्येच्या कटात सचिन वाझे यांच्या संपर्कात असल्याचा संशय असल्याने एनआयएने प्रदीप शर्मा यांना चौकशीसाठी बोलावले असल्याची चर्चा आहे. त्याआधीच सकाळी मुंबईचे माजी पोलिस आय़ुक्त परमबीर सिंह यांनीही एनआयए मुख्यालयात हजेरी लावली. एनआयए पाठोपाठच आता या संपुर्ण प्रकरणात सेंट्रल ब्युरो ऑफ इनवेस्टिगेशन (सीबीआय) ची एंट्री झाली आहे. सीबीआयनेही परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपाबाबतची चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी मोठे मासे हाती लागण्याची शक्यता अधिकाधिक यंत्रणांच्या समावेशामुळे निर्माण झाली आहे.

मनसुख हिरेन हत्येच्या कटात माजी पोलिस अधिकाऱ्याचे होते नाव

मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट रचण्यासाठी जी बैठक झाली होती, त्यामध्ये एका माजी पोलिस अधिकाऱ्याचा समावेश होता अशी चर्चा होती. त्यामुळे हा माजी पोलिस अधिकारी कोण अशा चर्चेला उधाण आलेले असतानाच आज एनआयएकडून माजी पोलिस अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. प्रदीप शर्मा यांच्या हजेरीने पुन्हा एकदा हा माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा आहे का ? अशा मोठ्या चर्चेला उधाण आले आहे. आज बुधवारी एनआयए प्रदीप शर्मा यांचा जबाब या संपुर्ण प्रकरणात नोंदवून घेईल. याआधी मुंबईच्या क्राईम इंटेलिजन्स युनिट (एनआययू) मध्ये सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा हे दोघेही एकत्र कार्यरत होते. पण सचिन वाझे यांनी सीआययू युनिट सोडल्यानंतर इतक्या वर्षात सचिन वाझे यांच्या संपर्कात प्रदीप शर्मा होते का ? तसेच मनसुख हिरेनच्या हत्येचा कट रचताना झालेल्या बैठकीत प्रदीप शर्मा यांची हजेरी होती का ? त्यामध्ये शर्मा यांचा नेमका काय सहभाग होता यासारख्या अनेक गोष्टींचा खुलासा प्रदीप शर्मा यांच्या जबाबाच्या निमित्ताने होणार आहे. त्यामुळेच सचिन वाझे यांच्याशी प्रदीप शर्मा यांचे नेमके काय कनेक्शन आहे हे या चौकशीच्या माध्यमातून स्पष्ट होईल.

परमबीर सिंग यांची चार तास चौकशी

- Advertisement -

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांना एनआयएने आज चौकशीसाठी मुख्यालयात बोलावले होते. त्यानुसार परमबीर सिंह सकाळी ९.३० वाजता एनआयए कार्यालयात हजर झाले. परमबीर सिंह यांची तब्बल ४ तास चौकशी चालली. दुपारी १.१५ च्या सुमारास परमबीर सिंह हे एनआयए कार्यालयातून बाहेर पडले. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांपैकी एक असे एपीआय सचिन वाझे होते. सचिन वाझे यांची गेल्या वर्षी कोरोना काळात नियुक्ती झाल्यानंतर त्यांना सीआययू युनिटमध्ये नेमण्यात आले होते. मुंबईचे विद्यमान पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिलेल्या अहवालामुळे परमबीर सिंह यांच्या अडचणीत आणखी भर पडेल असे बोलले जात आहे.


 

- Advertisement -