घरताज्या घडामोडीNIA मार्फत तपासाला मोठा वेग, API सचिन वाझेंची मर्सिडीज कार, मोबाईल,कॉम्प्युटर ताब्यात

NIA मार्फत तपासाला मोठा वेग, API सचिन वाझेंची मर्सिडीज कार, मोबाईल,कॉम्प्युटर ताब्यात

Subscribe

प्रसिद्ध उद्योगपती मुकेस अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात संशयित असलेले सीआययू ब्रॅंचचे एपीआय सचिन वाझे यांची नॅशनल इनवेस्टीगेशन एजन्सी (एनआयए) मार्फत चौकशी सुरू असतानाच सीएसटी येथील एका पार्किंग लॉटमधून एनआयएने एक मर्सडीझ कार ताब्यात घेतली आहे. ही कार सचिन वाझे यांची असल्याचे सूत्राची माहिती. या कारमध्येच मनसुख हिरेन आणि वाझे यांची सीएसटी ला भेट झाली होती. ज्यादिवशी मनसुख हिरेन यांची स्कॉर्पिओ कार विक्रोळी येथे खराब झाली होती, त्याच दिवसाची ही घटना असल्याची सूत्रांची माहिती आहे. मनसुख हिरेन हे ओला कॅबमधून क्रॉफर्ड मार्केट येथे येत असताना त्यांनी आपले लोकेशन बदलून सीएसटी येथे उतरला असल्याचा दावा या संपुर्ण प्रकरणात केला जात आहे.

एनआयएने दिवसभरात केलेल्या कारवाईत आज मंगळवारी सचिन वाझे बसत असलेल्या आयुक्तालयातील केबिनमधून एनआयएने काही कागदपत्रे, सचिन वाझेंचा मोबाइल, ते वापरत असलेला काँम्प्यूटरही जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. एनआयएने या संपुर्ण प्रकरणात आतापर्यंत मुंबई पोलिस दलातील ७ जणांची आतापर्यंत केली चौकशी केली आहे.

- Advertisement -

मनसुख हिरेन यांनी आपली गाडी खराब झाल्याचा बनाव करत ही स्कॉर्पिओ कार चोरी झाल्याची तक्रार ही विक्रोळी पोलिस ठाण्यात दाखल केली होती. विक्रोळीतील ती गाडीची चोरी होणं म्हणजे सोंगच असल्याचा तपास यंत्रणेमार्फत दावा केला जात असल्याची माहिती आहे. वाझेंनी त्यांच्या राहत्या घराच्या सोसायटीचा CCTV ताब्यात घेतल्याबाबत वरिष्ठांना कोणतिही माहिती नाही असेही आढळले आहे. तसेच एनआयएकडून वारंवार चौकशी होत असणारे काझीचांही या गुन्ह्यात समावेश असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. काझी यांनीच ठाण्यातल्या दुकानातून नंबर प्लेट तसेच सीपीयू आणि CCTV देखील काझी यांनीच आणले असल्याचा एनआयएचा संशय आहे.

पुरावे रेकाँर्डवर न आणल्याने ते कृत्य पुरावे नष्ठ करण्याच्या हेतूनेच केले असल्याचा तपास यंत्रणेचा दावा आहे. मनसुख हिरेनवर या संपूर्ण प्रकरणात संशय होताच असेही तपास यंत्रणेतील सूत्रांचे म्हणणे आहे. याआधी १७ फेब्रुवारी रोजी गाडी चोरीची तक्रार घेण्यासाठी विक्रोळी पोलिस ठाण्यात एका अधिकाऱ्याने फोन केला होता, अशी माहिती केंद्रीय तपास यंत्रणेला समोर आली आहे. अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत वाझेंनी ती कार वापरली नसल्याचं सांगितलं होते. स्फोटकांनी गाडी सापडली, त्यावेळी वाझे मुख्यालयात होते असाही दावा करण्यात येत आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -