घरताज्या घडामोडीमालवणी ISIS प्रकरणात दोन ISIS दहशतवाद्यांना ठरवले दोषी

मालवणी ISIS प्रकरणात दोन ISIS दहशतवाद्यांना ठरवले दोषी

Subscribe

मालडमधील मालवणी ISIS प्रकरणात दोन ISIS दहशतवाद्यांना NIA विशेष न्यायालयाने दोषी ठरवले आहे. काल, बुधवारी एनआयए विशेष न्यायालयाने आरोपपत्र दाखल केलेल्या आरोपींना याप्रकरणात दोषी ठरवले आहे. याप्रकरणात आता उद्या, शुक्रवारी पुढील सुनावणी होणार आहे. पुढील सुनावणीमध्ये आरोपींना कोणती शिक्षा द्यायची, याबाबतचा निर्णय होणार आहे.

नक्की काय आहे प्रकरण? 

मुस्लिम तरुणांना इस्लामिक स्टेट (IS) मध्ये सामील होण्यासाठी कट्टरपंथी बनवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनी या तरुणांना भारतातील सहयोगी राष्ट्रांविरुद्ध युद्ध करण्यासाठी IS/ISIL/ISISचे सदस्य होण्यासाठी परदेशात प्रवास करण्यास प्रवृत्त केले होते. हा खटला मूळतः काळाचौकीच्या दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) ३० डिसेंबर २०१५ रोजी नोंदवला होता. त्यानंतर एनआयएने १८ मार्च २०१६ रोजी त्याची पुन्हा नोंद केली. मग तपास पूर्ण झाल्यानंतर एनआयएने १८ जुलै २०१६ आरोपपत्र दाखल केले होते.

- Advertisement -

दरम्यान तपासात उघड झाले आहे की, रिजवान अहमद आणि मोहसीन इब्राहिम सय्यद यांनी मालवणी भागातील असुरक्षित मुस्लिम तरुणांना भडकवले, धमकावले आणि प्रभावित केले. त्यांना इस्लामच्या कारणासाठी फिदाईन लढवय्ये बनण्यास भाग पाडले आणि त्यांना पाठविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. काल, बुधवारी एनआयए विशेष न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी ठरवेल. आता आरोपींच्या शिक्षेसंदर्भातील सुनावणी उद्या होणार आहे.


हेही वाचा – १०वी ऑनलाईन क्लासच्या URL ऐवजी शिक्षकाने पोस्ट केली अश्लील फिल्मची लिंक अन्…

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -