घरताज्या घडामोडीमुंबई उपनगर जिल्हाधिकारीपदी निधी चौधरी, चार दिवसात पुन्हा बदली

मुंबई उपनगर जिल्हाधिकारीपदी निधी चौधरी, चार दिवसात पुन्हा बदली

Subscribe

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या ठिकाणी निधी चौधरी यांची बदली झाली.

रायगड जिल्हाधिकारी पदावरून शुक्रवारी तडकाफडकी बदली करण्यात आलेल्या सनदी अधिकारी निधी चौधरी यांची पुन्हा चार दिवसातच मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांना माहिती तंत्रज्ञान खात्यात संचालक म्हणून बदली दाखवली होती. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या ठिकाणी निधी चौधरी यांची बदली झाल्याने बोरीकर आता पर्यटन संचालक या पदावर पदभार सांभाळतील. निधी चौधरी या दीड वर्षे रायगडच्या जिल्हाधिकारी असताना प्रशासकीय अधिकार्‍यांसह त्यांनी जिल्ह्यातील कारभाराला शिस्त लावली होती. मात्र, त्यांचा वक्तशीरपणा आणि कडक स्वभाव हा अनेक गैरकामांच्या आड येत होता.

माझ्या कारकिर्दीत मी कोणतेही चुकीचे काम करणार नाही, असे त्यांनी राजकारण्यांना ठणकावून सांगितल्याचे अनेकजण सांगतात. मात्र, केवळ दीड वर्षांत रायगड जिल्ह्यावर तौक्ते चक्रीवादळ, कोरोनाच्या उपाययोजना आणि महाडमधील दरड कोसळलेल्या दुर्घटनेत चौधरी यांनी केलेले काम हे सर्वांच्याच लक्षात आहे. मात्र, एका प्रामाणिक अधिकार्‍याला केवळ दीड वर्षांत बदलल्यास चुकीचा संदेश जाईल, यामुळे त्यांची सन्मानाने मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी नियुक्ती केल्याचे मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने ‘आपलं महानगर’ला सांगितले.

- Advertisement -

यापूर्वी त्यांची बदली माहिती तंत्रज्ञान खात्यात संचालक पदी केली होती. मंत्रालयातील ही पोस्टिंग साईडपोस्टिंग समजली जात असल्याने अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी चार दिवसात पुन्हा निधी चौधरी यांना रायगडवरून मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती दिली आहे.

दरम्यान, राज्य सरकारने मंगळवारी चार सनदी अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यानुसार महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज यांची महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी झाली आहे. तर डॉ. निरुपमा डांगे यांची नियुक्ती नवी दिल्ली, महाराष्ट्र सदन येथे सहाय्यक निवासी आयुक्त म्हणून करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -