घरCORONA UPDATEमुंबईत १५ जुलैपर्यंत रात्रीची संचारबंदी जाहीर!

मुंबईत १५ जुलैपर्यंत रात्रीची संचारबंदी जाहीर!

Subscribe

लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्यात आल्यानंतर अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याकारणाने मुंबईत पुन्हा एकदा रात्री ९ ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. एकापेक्षा अधिक जण एकत्रित आल्यावर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर मुंबईतील काही उपनगरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मुंबईत सध्याच्या घडीला ७५० कंटेन्मेंट झोन असून सुमारे ६ हजार इमारती सील करण्यात करण्यात आल्या आहेत. कुर्ला एल विभागात सर्वाधिक ९६ कंटेन्मेंट झोन आहेत. मुंबई पोलिसांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईतील रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध कारवाईचा बडगा उचलला आहे.

- Advertisement -

दरम्यान, १ जुलैपासून १५ जुलैपर्यंत मुंबईतील कंटेन्मेंट झोनमध्ये आवश्यक सेवा वगळता लॉकडाऊन वाढवण्यात आलेला आहे. दूध, किराणा, भाजीपाला, रुग्णालय वगळता इतर दुकाने बंद करण्यात येणार असून रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत मुंबईत संचारबंदी लागू करण्यात आली असल्याच्या आदेशाचे पत्रक मुंबई पोलिसांनी जारी केले आहे. या संचारबंदीत विनाकारण फिरणाऱ्यास तसेच एकापेक्षा अधिक जण विनाकारण एकत्रित आल्यास त्यांच्यावर कोविड १९ – साथीचा रोग कायदा कलम १८८, तसेच १४४ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -