घरमुंबईरात्रशाळेतील शिक्षक, विद्यार्थ्यांची शाळेत तपासणी करा

रात्रशाळेतील शिक्षक, विद्यार्थ्यांची शाळेत तपासणी करा

Subscribe

शिक्षकांना कोविड- १९ चाचणी करून शाळेत येणे बंधनकाकर केले आहे. परंतु शिक्षकांना मिळणार्‍या तुटपुंजा वेतनामुळे कोविड चाचणीची व्यवस्था शाळेतच करण्यात यावी अशी मागणी रात्र शाळेतील शिक्षकांकडून करण्यात येत आहे.

ऑनलाईन व ऑफलाईन कामासाठी शिक्षकांची शाळेमध्ये ५० टक्के उपस्थिती आणि २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार शिक्षकांना कोविड- १९ चाचणी करून शाळेत येणे बंधनकाकर केले आहे. परंतु शिक्षकांना मिळणार्‍या तुटपुंजा वेतनामुळे कोविड चाचणीची व्यवस्था शाळेतच करण्यात यावी अशी मागणी रात्र शाळेतील शिक्षकांकडून करण्यात येत आहे.

इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू करून शाळा सुरू करण्याचे आदेश शिक्षण विभागामार्फत देण्यात आलेले आहेत. मुंबईतील रात्रशाळेत शिकवणार्‍या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना तुटपुंजे वेतन दिले जते. त्यामुळे कोविड-१९ तपासणी व त्यातून उद्धभवणार्‍या आजारपणास येणारा खर्च रात्र शाळेतील कर्मचार्‍यांना परवडणारा नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक फटका बसू शकतो. ही बाब लक्षात घेऊन मुंबई विभागातील १२० रात्रशाळेतील कर्मचार्‍यांची व विद्यार्थ्यांची मोफत कोविड-१९ चाचणी शासनामार्फत किंवा महापालिकाच्या वतीने मोफत करून देण्यात यावी. त्याचप्रमाणे रात्रशाळेतील कर्मचार्‍यांना व विद्यार्थ्याना रात्रशाळेतच आवारात आरोग्य सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी शिक्षक परिषदेचे संयोजक निरंजन गिरी यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -