घरअर्थसंकल्पीय अधिवेशन 2023अजितदादांच्या टीकेला उत्तर देताना राणेंनी 'ती' लिस्ट काढली बाहेर! म्हणाले, "पुण्यात येऊन..."

अजितदादांच्या टीकेला उत्तर देताना राणेंनी ‘ती’ लिस्ट काढली बाहेर! म्हणाले, “पुण्यात येऊन…”

Subscribe

यावेळी बोलता बोलता नितेश राणेंनी अजित पवारांना चॅलेंजही दिलं. म्हणाले, 'माझ्या नादाला लागू नका.....'

“शिवसेनेतून बाहेर पडल्यावर नारायण राणे तर दोनवेळा पडले. एकदा कोकणातून तर दुसऱ्यावेळी वांद्रे मतदारसंघात एका बाईने नारायण राणेंना पाडलं” असं म्हणत अजित पवारांनी नारायण राणेंची खिल्ली उडवली. यावरून आता राजकीय वर्तुळात टीकाटिप्पणी सुरु झाली आहे. याला आता नितेश राणेंनी तोडीसतोड उत्तर दिलंय. यासाठी नितेश राणेंनी सर्वांसमोर एक भलीमोठी यादीच वाचून दाखवली.

शिवसेना फोडणारे आणि शिवसेनेला सोडून गेलेले कसे पराभूत झाले हे सांगत असताना अजित पवारांनी नारायण राणेंना टार्गेट केलं. त्यावर आता अजित पवार आणि नितेश राणे यांच्यात चांगली जुंपली आहे. नितेश राणेंनी तर विधानसभेत सर्वांसमोर अजित पवारांना चॅलेंज दिलंय. तसंच शिवसेना सोडल्यानंतर नेत्यांचा पराभव होतो असा खोटा प्रचार करत असल्याचा आरोपही नितेश राणेंनी केलाय. यासाठी त्यांनी एक यादीच वाचून दाखवत शिवसेना सोडलेले नेते कायम यशस्वीच होत राहिले, हे सिद्ध केलंय.

- Advertisement -

नारायण राणे जरी आता केंद्राच्या कॅबिनेटमध्ये गेले असले तरी जेव्हा त्यांनी शिवसेना सोडली होती तेव्हा त्यांच्या ११ समर्थक आमदारांनी देखील पक्ष सोडला होता. कालिदास कोळंबकर, शंकर कांबळी, गणपत कदम, सुभाष बणे, विजय वडेट्टीवार यांचा यात समावेश होता. हे सर्व जण आज सभागृहात बसले आहेत. विनायक निम्हण, माणिकराव कोकाटे, प्रा, नवले, शाम सावंत यापैकी फक्त शाम सावंत यांचा पराभव झाला, बाकी सगळे जास्तित जास्त मतांनी विजयी झाले, असं नितेश राणेंनी अजित पवारांना सांगितलं. इतकंच नव्हे शिवसेना सोडल्यानंतर कोळंबकर यांना मुंबई शिवसेनेविरूद्ध २० हजार मतांनी विजयी झाले. तसंच शिवसेना सोडून कॉंग्रेसमध्ये गेलेल्या नेत्यांना भरघोस मतं मिळाली. मग चुकीची माहिती कशा महाराष्ट्राला द्यायची, असा सवाल देखील नितेश राणेंनी अजित पवारांना केला.

तसंच बाईने पाडलं या अजित पवारांच्या वक्तव्यावरून नितेश राणेंनी चांगलंच सुनावलं. “बाईंनी पाडलं म्हणत महिलांचा जो अपमान केला जातो, त्याचा खरा इतिहास महाराष्ट्राला माहिती पाहिजे. आता, २ मार्च रोजी पिंपरी चिंचवडचा निकाल येईल, तेव्हा पाहुयात बाई कोणाला पाडतेय ते, असे म्हणत आमदार नितेश राणेंनी अजित पवारांना सभागृहातच टार्गेट केलं. यावेळी बोलता बोलता नितेश राणेंनी अजित पवारांना चॅलेंजही दिलं. ‘माझ्या नादाला लागू नका, पुण्यात येऊन बारा वाजवीन’ असं म्हणत नितेश राणे अजित पवारांवर कडाडले. यावर आता अजित पवार यांनी “स्वागत आहे” असं म्हटलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -