डुप्लिकेट हिंदुत्वाबद्दल बोललो तर तुम्हाला राग येण्याचे कारण काय?, नीलेश राणेंचा दीपक केसरकरांना प्रश्न

rane kesarkar

राज्यात शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर आणि माजी खासदार निलेश राणे यांच्यात आरोप प्रत्यारोपाचा कलगी तुरा रंगला आहे. केसरकरांच्या आरोपांवर उद्धव ठाकरे डुप्लिकेट हिंदुत्व दाखवत होते, म्हणून तुम्ही येथे आलात. जे डुप्लिकेट हिंदुत्व दाखवत होते. त्यांच्याबद्दल आम्ही काही बोललो तर तुम्हाला राग येण्याचे कारण काय? असा प्रश्न माजी खासदार निलेश राणे यांनी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांना विचारला आहे.

दीपक केसरकर हे शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत, असे ते बोलतात. मात्र, ते वागतात असे की, ते विश्व प्रवक्ते आहेत. त्यांना सर्व कळते. ते असे वागत आहेत की, त्यांना बोरिस जॉन्सन यांच्याबद्दल विचारले तर ते त्यावरही बोलतील. एकनाथ शिंदे यांनी केसरकर यांना पुन्हा एकदा राजकीय जीवनदान दिले आहे. राजकीय कुबड्या दिल्या. मी माझ्या ट्वीटमध्ये म्हटल्याप्रमाणे जितकी युती टिकवण्याची जबाबदारी आमची आहे, तितकी त्यांचीही आहे. केसरकरांनी नको त्या गोष्टीत पडू नये. राणेंच्या दोन मुलांनी मतदारसंघात केसरकर यांना झिरो केले, असे राणे म्हणाले.

तेव्हा केसरकर काही बोलले नाहीत –

निलेश राणे म्हणाले की, शरद पवार वयाच्या 38 व्या वयात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मी 41, 42 वर्षांचा आहे. केसरकर यांना वयाबद्दल बोलायचे नव्हते, त्यांना आम्हाला कमी लेखायचे होते. राणे म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आम्ही आजच असे बोलत आहोत, असे नाही. मागच्या अडीच वर्षांपासून आम्ही असेच बोलत होतो. मात्र, तेव्हा केसरकर काही बोलले नाहीत. कारण त्यांना उद्धव ठाकरेंनी मंत्री केले नाही. उद्धव ठाकरे आणि कुटुंबावर आम्ही जहरी टीका केली, जेव्हा ते सत्तेत होते. तेव्हा का केसरकर बोलले नाही. राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे डुप्लिकेट हिंदुत्व दाखवत होते, म्हणून तुम्ही इथे आलात. मग उद्धव ठाकरे यांचा इतका पुळका कशाला? हिंदुत्वासाठी तुम्ही येथे आला. जर हिंदुत्वासाठी ही युती झाली असेल आणि जे डुप्लिकेट हिदुत्व दाखवत होते. त्यांच्याबद्दल आम्ही काही बोललो तर तुम्हाला राग येण्याचे कारण काय?, असे राणे म्हणाले.