घरमुंबईअखेर निंबाळकर पिता-पुत्राला अटक

अखेर निंबाळकर पिता-पुत्राला अटक

Subscribe

येथील लक्ष्मण निंबाळकर आणि त्याचा मुलगा शंतनू निंबाळकर या दोघांवर फसवणूक, बलात्कार आदी प्रकरणी गुन्हे दाखल होते. मात्र गेले चार महिने हे दोघेही पोलिसांना गुंगारा देत असताना अखेर शहर पोलिसांनी कारवाई करून शुक्रवारी रात्री त्यांना अटक केली. ही माहिती शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शैलेश सणस यांनी पत्रकारांना दिली.

मूळ तालुक्यातील मांडले गावाचे रहिवाशी असलेले मात्र शहरात वास्तव्यास असलेल्या निंबाळकर याने खोट्या जाहिराती देऊन अनेकजणांची जमीन खरेदी विक्रीत फसवणूक केली आहे, तर त्याचा मुलगा शंतनू निंबाळकर याने फेब्रुवारी 2018 मध्ये शहरातील एका मुलीला फसवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. हा प्रकार तो राहत असलेल्या सायली कॉम्प्लेक्स आणि नाते खिंड येथील एका इमारतीमध्ये झाला आहे.

- Advertisement -

या दरम्यान सदर मुलगी गरोदर राहिली. मात्र गर्भपात करण्यासाठी मुलीने केलेल्या पैशाच्या मागणीला शंतनू याने नकार दिला. त्यानंतर ही मुलगी वैफल्यग्रस्त झाली. त्यात तिने 11 ऑक्टोबर 2018 रोजी वाशी येथे रेल्वेतून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र शंतनू हा गेले चार महिने फरार झाला होता. सदर घटना येथेे घडली असल्याने हा तपास स्थानिक पोलिसांकडे आला होता.

वाशी पोलिसांना शंतनू निंबाळकर मिळाला नाही. अखेर शहर पोलिसांना खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शंतनू निंबाळकर एका फ्लॅटमध्ये राहत असल्याचे समजताच सापळा रचून त्याला रात्री अटक केली. यावेळी लक्ष्मण हा देखील याच ठिकाणी पोलिसांना आढळून आला असता त्याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी पाटील आणि पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी, पोलीस कॉन्स्टेबल बल्लाळ, शिंदे, जगताप यांच्या पथकाने ही कारवाई केली. या दोघांबाबत कोणाच्या तक्रारी असतील तर कळवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -