Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई मुंबईत प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये स्थापणार 'निर्भया पथक'; पोलिस आयुक्तांचे आदेश

मुंबईत प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये स्थापणार ‘निर्भया पथक’; पोलिस आयुक्तांचे आदेश

Related Story

- Advertisement -

मुंबईतील साकीनाका परिसरात एका महिलेवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्येच्या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून अशा घटना पुन्हा होऊ नये यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. एकीकडे, पोलीस प्रशासनाला सूचना केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये निर्भया पथक स्थापन करण्याचे आदेश पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिले आहेत.

साकीनाका परिसरातील बलात्काराच्या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी सक्रिय होत महिलांच्या सुरक्षेसाठी वेगवेगळ्या उपाययोजना आखायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतील प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये आता महिला सुरक्षा पथक स्थापन करण्यात येणार आहे. या पथकाचे नाव निर्भया पथक असावे अशा सूचना मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली आहे.

- Advertisement -

मुंबईच्या सर्व पोलिस ठाण्यांमध्ये ‘महिला सुरक्षा कक्ष’ स्थापन करण्याचे आदेश जारी करण्यात आले. मुंबईच्या प्रत्येक पोलीस ठाण्यात तैनात मोबाईल व्हॅनपैकी निर्भया पथकासाठी एक मोबाईल व्हॅन तैनात केली जाणार आहे. मुंबईच्या प्रत्येक विभागात निर्भया पथकाचे नोडल अधिकारी म्हणून एक महिला एसीपी किंवा महिला पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. या निर्भया पथकाविषयी माहिती पसरवण्यासाठी रेडिओ, टेलिव्हिजन, बातम्या यासारख्या विविध संवादाच्या माध्यमांचा वापर करण्यात येणार असून निर्भया पथकासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक विशेष डायरी केली जाईल, ज्यामध्ये प्रत्येक तपशील स्वतंत्रपणे उपस्थित असेल. जे वेळोवेळी नोडल अधिकारी तपासतील.

ज्या पोलीस ठाणे हद्दीत बालगृह, अनाथालय किंवा महिला पीजी आहे तेथे गस्त घालून गोपनीय माहिती गोळा करण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत, ज्या भागात महिलांशी संबंधित गुन्ह्यांच्या घटना समोर आल्या आहेत त्या क्षेत्रांची ओळख करून घ्यावी आणि त्यानुसार गस्तीची पद्धत तयार केली जाईल. तसेच झोपडपट्टी, मनोरंजन पार्क, शाळा, कॉलेज कॅम्पस, थिएटर, मॉल्स, बाजारपेठा, बस स्टँड आणि रेल्वे स्थानकांकडे जाणारे भूमिगत पास, याशिवाय ज्या ठिकाणी लोकांची कमी दरवळ असेल त्यांना हॉटस्पॉटमध्ये समाविष्ट कऱण्यात येणार आहे.

- Advertisement -

जर एखादी मुलगी रात्री प्रवास करत असेल आणि तिने मदत मागितली तर तिला सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी मदत करण्यात येईल. अतिरिक्त आयुक्तांना त्यांच्या परिसरात सल्ला शिबिर लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या ठिकाणी पीडित महिला, पीडित मुलाचे समुपदेशन मानसोपचारतज्ज्ञांकडून केले जाईल. ५ अतिरिक्त आयुक्तांच्या स्तरावर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी शिबिरे लावली जाणार. अतिरिक्त आयुक्त स्तरावर, असे आदेश देण्यात आले आहेत की प्रशिक्षण घेत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गुप्त कॅमेरे हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जाईल जेणेकरून स्त्रियांवर पाळत ठेवणे किंवा पाठलाग करणे अशा प्रकरणांमध्ये पुरावे गोळा केले जाऊ शकतात. यासह, दररोज कॅमेऱ्यात रेकॉर्ड होणारी सर्व माहिती पोलीस स्टेशनमध्ये जाऊन संगणकात सेव्ह देखील केली जाणार आहे.


 

- Advertisement -