घरताज्या घडामोडीखिडकी योजनेतून मुंबईतील ६५० गृह खरेदी दारांना निर्मला सीतारामण यांच्या हस्ते चाव्या...

खिडकी योजनेतून मुंबईतील ६५० गृह खरेदी दारांना निर्मला सीतारामण यांच्या हस्ते चाव्या हस्तांतरीत

Subscribe

मध्यम वर्गीयांना परवडणाऱ्या दरात आणि मध्यम उत्पन्न गृह निधी खिडकी योजनेतून घर खरेदीदारांना मदत मिळते.

मुंबईतील रिवली पार्क हा प्रकल्प भारतातील पहिला गृहनिर्माण प्रकल्प आहे. खिडकी योजनेतील मुंबईतील ६५० गृह खरेदी दारांना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या हस्ते चाव्या हस्तांतरीत करण्यात आल्या आहेत. निर्मला सीतारामण यांनी व्हिसीच्या मध्यमातून या गृह खरेदीदारांना घराचा ताबा दिला आहे. खिडकी योजनेतील मुंबईत असणारा रिवाली पार्क विंटरग्रीन्स हा पुर्ण होणारा पहिला प्रकल्प आहे. या प्रकल्पाला स्वामी (SWAMIH) फंडातून गुंतवणूक करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या विशेष खिडकी योजनेतून SBICap Ventures च्या सहाय्याने मध्यमवर्गियांना परवडणाऱ्या दरात घरे देण्याचा हा पहिला प्रकल्प आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर, श्री दुर्गा शंकर मिश्रा, सचिव, गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय; श्री अजय सेठ, सचिव, अर्थ व्यवहार मंत्रालय, अर्थ मंत्रालय; श्री के. राजारामन, अतिरिक्त सचिव, आर्थिक व्यवहार विभाग, अर्थ मंत्रालय; श्री दिनेशकुमार खरा, अध्यक्ष, एसबीआय, आणि एसबीआयसीएपी व्हेंचर्स लिमिटेडचे ​​अन्य अधिकारी व्हिसीद्वारे उपस्थित होते.

- Advertisement -

मध्यम वर्गीयांना परवडणाऱ्या दरात आणि मध्यम उत्पन्न गृह निधी खिडकी योजनेतून घर खरेदीदारांना मदत मिळते. यामध्ये २०४ प्रकल्प आहेत. ज्यातील गुंतवणूक ही १८. ५४६ कोटी आहे. या योजनेमध्ये एकुण १,१६५७२ गृह घर खरेदीदारांना लाभ मिळणार आहे. मुंबईतील रिवली पार्क हा प्रकल्प ७ एकरांवर उभा करण्यात आला आहे. केबल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडची सहयोगी कंपनी सीसीआय प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड (सीसीआयपीपीएल) यांनी विकसित केलेला “ रिवाली पार्क विंटरग्रीन” हा प्रकल्प आहे .

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -