घरताज्या घडामोडीमुंबईतील बीकेसीत कलाप्रेमींसाठी NMACC ची स्थापना; आंतरराष्ट्रीय दर्जाचे सांस्कृतिक केंद्र

मुंबईतील बीकेसीत कलाप्रेमींसाठी NMACC ची स्थापना; आंतरराष्ट्रीय दर्जाचे सांस्कृतिक केंद्र

Subscribe

मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलन (बीकेसी) येथे नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र अर्थात NMACC उभारण्यात आले आहे. रिलायन्स उद्योग समुहातर्फे सांस्कृतिक केंद्र उभारण्यात आले आहे. भारतीय आणि जागतिक कलेच्या प्रदर्शनासाठी ही इमारत उभारण्यात आली आहे.

मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलन (बीकेसी) येथे नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र अर्थात NMACC उभारण्यात आले आहे. रिलायन्स उद्योग समुहातर्फे सांस्कृतिक केंद्र उभारण्यात आले आहे. भारतीय आणि जागतिक कलेच्या प्रदर्शनासाठी ही इमारत उभारण्यात आली आहे. एकूण चार मजल्याची ही उभारण्यात आली असून, भारतीय कलेचं संवर्धन या केंद्रातून होणार आहे. विशेष म्हणजे कलाप्रेमींचा उत्साह वाढवण्यास मदत होणार आहे. (nita mukesh ambani cultural centre in bandra kurla complex mumbai)

जिओ वर्ल्ड सेंटरमधील फाउंटन ऑफ जॉयच्या शेजारी ही चार मजली इमारत उभारण्यात आली आहे. ही जागा भारतीय कलेचा खजिना प्रदर्शित करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. भारताकडे जगाने व्यापक सांस्कृतिक दृष्टीकोनातून पाहाण्याचा मानस आहे.

- Advertisement -

या चार मजली सांस्कृतिक केंद्राच्या इमारतीत आर्ट हाऊस, द ग्रँड थिएटर, द क्यूब, द स्टुडिओ थिएटर उभारण्यात आले आहेत. या सांस्कृतिक केंद्राबाबत रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापिका-अध्यक्षा नीता अंबानी म्हणाल्या की, “भारतीय कलांचे जतन आणि संवर्धन करण्याची आमची वचनबद्धता आहे. मला आशा आहे की ही जागा प्रतिभेची जोपासना करेल आणि विविध प्रतिभांना प्रेरणा देईल, भारत आणि जगभरातील लोकांना एकत्र आणेल”.

आर्ट हाऊस

  • कल्चरल सेंटरचा दर्शनी भाग, ज्याठिकाणी एक लार्जर-दॅन-लाइफ कफ ब्रेसलेट डिझाइन आहे, तो भारताच्या समृद्ध वारशाबद्दल बोलतो.
  • आर्ट हाऊसमध्ये विशिष्ट वास्तुकला वापरण्यात आली आहे.
  • ही जारा १६००० चौरस फूटांची आहे.
  • केवळ कलाच नाही, तर तंत्रज्ञान कार्यक्रम, कार्यशाळा आणि शैक्षणिक कार्यक्रमांनाही याचून मदत होईल.

द ग्रँड थिएटर

  • NMACC मध्ये अत्याधुनिक असे तीन मजली ‘द ग्रँड थिएटर’ उभारण्यात आले आहे.
  • या थिएटरची आसन क्षमता २००० इतकी आहे.
  • या थिएटरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची डॉल्बी अॅटमॉस ध्वनी यंत्रणा उभारण्यात आली आहे.
  • अकौस्टिक सिस्टिम आणि सर्वोत्तम प्रकाश व्यवस्था आहे.
  • या थिएटरमध्ये भाषांतराची सुविधा उपलब्ध आहे.
  • याठिकाणी १८ डायमंड बॉक्सचा वापर करण्यात आला आहे.

द क्यूब

  • भारतीय कलाकारांना नवीन प्रायोगिक रंगभूमी, स्पोकन वर्ड, स्टँड-अप कॉमेडी आणि संगीतातून प्रोत्साहन मिळावे याकरता या सांस्कृतिक केंद्रात क्यूब नावाची जागा आहे.
  • ज्याठिकाणी कमी प्रेक्षकांसमोर कला सादर करता येईल.
  • इथे हलवता येण्याजोगा स्टेज आणि आसन व्यवस्था आहे.
  • येथे १२५ सीट्स आहेत.
  • Panasonic लेसर प्रोजेक्शन सिस्टीम आणि इन्फ्रारेड एमिटर प्रणाली आहे.
  • 5G कनेक्टिव्हिटीसह संपूर्णपणे इंटिग्रेटेड व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि उत्पादन सेट-अप आहे.

द स्टुडिओ थिएटर

  • स्टुडिओ थिएटर तांत्रिकदृष्ट्या प्रगत आहे.
  • २५० जणांसाठी आसनव्यवस्था आहे.
  • ही टेलिस्कॉपिट सिस्टिम आहे.
  • कार्यक्रमाच्या गरजेनुसार जलद आणि सुलभ परिवर्तन इथे शक्य आहे.
  • अतुलनीय ध्वनीरोधक क्षमता आणि जागतिक दर्जाची डॉल्बी अॅटमॉस सराउंड साउंड सिस्टीम आहे.
  • छोट्या ते मोठ्या प्रमाणातील ऑडियन्ससाठी कार्यक्रम करता येऊ शकतो.
  • स्टुडिओ थिएटरमध्ये टेंशन वायर ग्रिड देखील आहे.
  • भारतात ही गोष्ट पहिल्यांदाच होत आहे.

हेही वाचा – अलर्ट! आता मुंबईतही कोरोना वाढला, दोन दिवसांत आढळले ‘एवढे’ रुग्ण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -