घरमुंबईतर महिनाभरात सचिन पुन्हा चालणार; कृत्रिम पाय बसवण्यासाठी नितेश राणेंची माणुसकी

तर महिनाभरात सचिन पुन्हा चालणार; कृत्रिम पाय बसवण्यासाठी नितेश राणेंची माणुसकी

Subscribe

कृत्रिम पाय बसवण्यासाठी जर्मनीतील ओटोबॉक (Otto Bock) हेल्थकेअर कंपनीशी संपर्क करण्यात आला.

दोन्ही पाय गमावल्यामुळे अपंगत्व आलेल्या सचिन सावंत या तरुणाच्या आयुष्यात नवी उमेद निर्माण करण्याच्या उद्देशाने आमदार नितेश राणे यांनी मदतीचा हात दिला आहे. महिनाभरात दोन नवे कृत्रिम पाय लागताच सचिन आधाराविना चालू शकणार आहे. नितेश राणे यांनी सचिनच्या कृत्रिम पायांचा संपूर्ण खर्च उचलला आहे. सचिनला दोन्ही कृत्रिम पाय बसवण्यासाठी जर्मनीतील ओटोबॉक (Otto Bock) हेल्थकेअर कंपनीशी संपर्क करण्यात आला. ओटोबोकच्या (Otto Bock) मुंबईतील सेंटरमध्ये सचिनच्या दोन्ही पायांचे माप घेण्यात आले. आता त्याच्या दोन्ही कृत्रिम पायांची ऑर्डर जर्मनीच्या कंपनीला देण्यात आली असून एका महिन्यात हे पाय जर्मनीवरून भारतात येतील. हे कृत्रिम पाय सचिनला बसवल्यानंतर तो त्याच्या पायांवर चालू शकणार आहे.

अपघातात दोन्ही पाय निकामी

कणकवली तालुक्यातील बावशी येथील सचिन सावंत या युवकाचा दीड वर्षांपूर्वी अपघात झाला होता आणि या अपघातात त्याचे दोन्ही पाय निकामी झाले होते. सचिनने मागील वर्षी ८ फेब्रुवारीला आमदार नितेश राणे यांची त्यांच्या कणकवलीतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. मानसिकदृष्ट्या खचलेला आणि रिक्षातूनही उतरू शकत नसलेल्या सचिनची त्यावेळी नितेश यांनी रिक्षाजवळ जाऊन विचारपूस केली होती. तसेच मुंबईत बोलावून दोन्ही पायांवर उभे करण्याचे आश्वासन नितेश यांनी त्याला दिले होते.

- Advertisement -

ओटोबॉक हेल्थकेअरशी संपर्क

त्यानुसार अलीकडेच सचिनला मुंबईत बोलावून नानावटी रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात आला आणि पुढील उपचार सुरु झाले. सचिनला त्याच्या पायावर उभे करायचे असेल, तर कृत्रिम पाय बसवण्याशिवाय पर्याय नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे सचिनला दोन्ही कृत्रिम पाय बसवण्यासाठी जर्मनीतील ओटोबॉक (Otto Bock) हेल्थकेअर कंपनीशी संपर्क करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -