Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई माहिम तो एक ट्रेलर हैं...!, मजारींवरील कारवाईनंतर नितेश राणेंचा इशारा

माहिम तो एक ट्रेलर हैं…!, मजारींवरील कारवाईनंतर नितेश राणेंचा इशारा

Subscribe

माहिममध्ये सुरू झालेलं हे कारवाईचं सत्र आता मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये वळणार, असा इशाराच यावेळी नितेश राणेंनी दिलाय.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात माहिमच्या दर्ग्यापासून काही अंतरावर समुद्रात नवी हाजीअली तयार केली जात असल्याचा आरोप केला होता. यावेळी राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभेत माहिमच्या समुद्रात असणाऱ्या मजारीचा उल्लेख केला होता. या मजारीभोवती दिवसाढवळ्या अनधिकृत बांधकाम केले जात असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. महिनाभरात हे अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले नाही तर त्याच्या बाजूला आम्ही गणपतीचं मंदिर उभारू. त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असेल तर आमच्याकडेही दुर्लक्ष करा, असं राज ठाकरेंनी भाषणात म्हटलं होतं. त्यानंतर आज सकाळीच माहिम इथल्या मजारीवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर यावर आता नितेश राणेंनी ट्वीट केलंय. “माहिम तो एक ट्रेलर हैं…!” असं त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलंय.

भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करत माहिममधील मजारींच्या कारवाईवरून विरोधकांना इशारा दिलाय. भाजप आमदार नितेश राणे आणि समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यात लव्ह जिहादच्या मुद्द्यावरुन खडाजंगी सुरू झाली आहे. अशात काही दिवसांपूर्वी नितेश राणेंनी लव्ह जिहादचे काही व्हिडीओ दाखवत लव्ह जिहाद आणि धर्मांतर या मुद्द्यावरून विरोधकांवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या बुधवारच्या सभेत माहिमच्या मजारींबाबत भाष्य केलं. राज ठाकरेंच्या सभेला काही तास उलटत नाही तोच आता मुंबई महानगरपालिकेचे पथक याठिकाणी कारवाईसाठी पोहोचले. यावरून आता नितेश राणेंनी ट्वीट करत विरोधकांवर निशाणा साधलाय.

- Advertisement -

माहीम तो एक trailer है…पुरे मुबंई में साफ सफाई अभी बाकी है! हे भगवाधारींच सरकार आहे, असं नितेश राणेंनी त्यांच्या या ट्वीटमध्ये लिहिलंय. मुंबईतही प्रत्येक वॉर्डमध्ये अशा प्रकारचं अनधिकृत बांधकाम सुरु आहे. त्यामुळे ही कारवाई फक्त माहिमपुरती नाही.” असं देखील नितेश राणेंनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलंय. त्यामुळे माहिममध्ये सुरू झालेलं हे कारवाईचं सत्र आता मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये वळणार, असा इशाराच यावेळी नितेश राणेंनी दिलाय.

आज सकाळपासूनच मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांचे पथक माहीमच्या समुद्रकिनाऱ्यावर तैनात आहे. कारवाईच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी माहीम परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, यावरून आता राज्यातील राजकीय वातावरण तापू लागलं असून याबाबत विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -