Saturday, June 3, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई सरकारनं केलं नसतं तर, आम्ही केलं असतं...- नितीन सरदेसाई

सरकारनं केलं नसतं तर, आम्ही केलं असतं…- नितीन सरदेसाई

Subscribe

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर माहिमधील मजारवर बुलडोझर फिरवण्यात आला आहे. यावर आता मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बुधवारी गुढीपाडव्यानिमित्त घेतलेल्या सभेत माहिमच्या दर्गाहचा मुद्दा मांडला. यावरून त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला इशाराही दिला. त्यानंतर लगेचच आज कारवाई सुद्धा करण्यात आली. मुंबई महापालिका, जिल्हाधिकारी आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने खाडीतील मजारच्या जागेवरील हिरवा झेंडा हटवला आणि अतिक्रमण हटवण्याला सुरुवात केली. तसंच अनधिकृत मजारवर बुलडोझर फिरवण्यात आला आहे. यावर आता मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. सरकारनं केलं नसतं तर आम्ही केलं असतं. ही एक कारवाई होती, असे अनेक बांधकाम आहेत, त्यावरही अशाच बेधडक कारवाया होतील, अशी अपेक्षा यावेळी नितीन सरदेसाई यांनी व्यक्त केलीय.

माहिममध्ये मजारींवर कारवाई झाल्यानंतर शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी मनसे नेत्यांची एक बैठक पार पडली. ही बैठक आता संपली आहे. या बैठकीनंतर मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी माहिमधील मजारींवर झालेल्या कारवाईवर आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना नितीन सरदेसाई म्हणाले की, राज ठाकरेंनी माहिममधील मजारींचा मुद्दा मांडल्यानंतर आम्ही आज तिथे जाणार होतो, त्यापूर्वीच प्रशासनाने ही कारवाई केली. राज ठाकरेंनी केलेल्या मागणीला तात्काळ यश आलं. त्यासाठी मी प्रशासनाचे आभार मानतो. जेव्हा राज ठाकरे एखादा विषय मांडतात, आणि त्यावर प्रशासनाने कोणती कारवाई केली नसती तर ती आम्ही केली असती.”

- Advertisement -

“तसंच आज एक बांधकाम तोडलं. पण अनेक ठिकाणी असे बांधकाम सुरू आहेत. सांगली आणि पनवेलमध्येही असे बांधकाम सुरू आहेत. त्यामुळे प्रशासनाने त्या सगळ्याच ठिकाणी अशी कारवाई केली पाहिजे. हा फक्त माहिमपुरता विषय नसून सगळीकडेच अशा बांधकामांवर कारवाई झाली पाहिजे. आज ही कारवाई झाली म्हणजे विषय संपला असं न करत सरकारने यापुढे असे बांधकाम होऊ नये यासाठी सतर्क राहिले पाहिजे.”, असा सल्ला देखील यावेळी नितीन सरदेसाई यांनी दिला आहे. त्या सगळ्या बांधकामांचा विषय आम्ही लावून धरू, त्या सगळ्या बांधकामांवरही अशाच धडक कारवाया सुरू राहतील, अशी अपेक्षा देखील यावेळी सरदेसाई यांनी व्यक्त केलीय.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -