घरमुंबईशाळा परिसरात जंक फूडला बंदी

शाळा परिसरात जंक फूडला बंदी

Subscribe

सुरक्षित खाद्य आणि निरोगी आहार २०१९ (Safe Food and healthy diets for School Children Regulations, 2019) या कायद्यातंर्गत शाळेच्या ५० मीटर आवारत जंक फूडला बंदी करण्यात आली आहे.

मुलांनी आरोग्यदायी आणि चांगल्या पदार्थांचे सेवन करावे यासाठी पालकांसह शाळेकडून देखील प्रयत्न केले जातात. पण तरीही जंक फूड विक्रेत्यांनी शाळा परिसरात केलेला शिरकाव पालक आणि शिक्षकांची मेहनत फुकट घालवताना सध्या सर्रास दिसते. लहान मुलं जंक फूडकडे पटकन आकर्षित होतात. त्यामुळेच मुलांची जंक फूड खाण्याची सवय सोडवण्यासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शालेय मुलांसाठी सुरक्षित खाद्य आणि निरोगी आहार २०१९ (Safe Food and healthy diets for School Children Regulations, 2019) या कायद्यातंर्गत शाळेच्या ५० मीटर आवारत जंक फूडला बंदी करण्यात आली आहे. अन्न सुरक्षा कायदा (FSSAI) अंतर्गत नुकताच हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला.

या ठिकाणी जंकफुडला बंदी

या बाबतची माहिती देताना अन्न सुरक्षा कायद्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “या नवीन नियमानुसार शाळेच्या कॅन्टीनमध्ये, मेसमध्ये, हॉस्टेलमध्ये आणि शाळेच्या ५० मीटर आवारात जंक फूड खाण्यावर बंदी घालण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे चरबीयुक्त पदार्थ, अतिप्रमाणात मीठ आणि साखर यावर देखील बंदी घालण्यात आली आहे.”

- Advertisement -

सकस आहाराला प्राधान्य द्यावे

शाळेचा परिसर सकस आहार म्हणून ओळखला जाण्यासाठी शाळेनेसुद्धा प्रयत्न करावा. यासाठी शाळेने सकस आहार डाएट स्विकारावा. शाळा परिसरात हंगामी आहार आणि स्थानिक खाद्यपदार्थांना प्राधान्य द्यावं. त्याचप्रमाणे शाळा परिसरात खाद्यपदार्थांची नासधूस होऊ नये यासाठी देखील प्रयत्न करावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -