घरताज्या घडामोडीनो मराठी, नो अ‍ॅमेझॉन..मनसेची नवीन मोहीम!

नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन..मनसेची नवीन मोहीम!

Subscribe

ऑनलाईन शॉनिंग कंपनी असलेल्या अ‍ॅमेझॉनला आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दणका देण्यास सुरुवात केली आहे.

ऑनलाईन शॉनिंग कंपनी असलेल्या अ‍ॅमेझॉनला आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दणका देण्यास सुरुवात केली आहे. अ‍ॅमेझॉनच्या अ‍ॅपवर मराठी पर्याय असावा, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली होती. सुरुवातीला याबाबत आपण विचार करु, असे म्हणणार्‍या अ‍ॅमेझॉनने थेट कोर्टात धाव घेतली. त्यामुळे आता मनसेविरुद्ध अ‍ॅमेझॉन संघर्ष सुरू झाला आहे. त्यात आता मनसेने ‘नो मराठी, नो मेझॉन, बॅन अमेझॉन, महाराष्ट्रात फक्त मराठी, इथून पुढे तुमची डिलिव्हरी तुमची जबाबदारी’ अशी मोहीम सुरू केली आहे.

अ‍ॅमेझॉन अ‍ॅपद्वारे जगातील बहुतांश लोक वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी करत असतात. यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. असंख्य मराठी भाषिक अ‍ॅमेझॉन संकेतस्थळावरून शॉपिंग करत असतात. त्यामुळे अ‍ॅमेझॉनच्या ऑनलाईन शॉपिंग अ‍ॅपला मराठीचा पर्याय असावा, अशी मागणी मनसेकडून काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. त्यानंतर सुरुवातीला याबाबत आपण विचार करु, असे म्हणणार्‍या अ‍ॅमेझॉन कंपनीने न्यायालयात धाव घेतली. महाराष्ट्रात मराठी भाषेचा वापर केला नाही तरी चालतो, असा कोणताही कायदा नाही, असा युक्तीवाद अ‍ॅमेझॉनने कोर्टात केला आहे. त्यामुळे आता न्यायालय यावर काय निर्णय देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे तसेच अ‍ॅमेझॉनने कोर्टात धाव घेतल्याने मनसेनेही नवीन मोहीम उघडली आहे. ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन, बॅन अ‍ॅमेझॉन, महाराष्ट्रात फक्त मराठी, इथून पुढे तुमची डिलिव्हरी तुमची जबाबदारी’ अशी मोहीम सुरू करत शॉपिंग साईटला विरोध सुरू केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -