Mumbai Lockdown: …म्हणून मुंबईत लॉकडाऊनची गरज नाही; पालिका आयुक्तांचं दिलासादायक वक्तव्य

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचे मापदंड पॉझिटिव्हिटी रेट होते. पण आता मुंबईतले १८६ रुग्णालय, ३५ हजार बेड्स उपलब्ध आहेत. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे निकष पॉझिटिव्हीटी ऐवजी रुग्णालयातील बेड्स आणि ऑक्सिजनचा वापर किती होतोय हे करावेत, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना सांगितले.

no need lockdown imposed in mumbai said bmc commissioner iqbal singh chahal
Mumbai Lockdown: ...म्हणून मुंबईत लॉकडाऊनची गरज नाही; पालिका आयुक्तांचं दिलासादायक वक्तव्य

काही दिवसांपूर्वी कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दैनंदिन रुग्णसंख्या २० हजार पार गेली तर, लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल, असा इशारा दिला होता. मात्र आत खुद्द आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मुंबईकरांना लॉकडाऊन संदर्भात मोठा दिलासा देणारी भूमिका स्पष्ट केली आहे. सध्याची मुंबईतील परिस्थिती पाहता लॉकडाऊनची गरज नसल्याचे इक्बाल सिंह चहल यांनी एबीपी वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केले आहे.

मुंबईत काल, गुरुवारी दैनंदिन रुग्णसंख्या २० हजार पार झाली. त्यामुळे मुंबईकरांमध्ये संभाव्य लॉकडाऊनची भीती आणि चिंता पसरली होती. मात्र आज महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल वृत्तवाहिनीसोबत बोलताना म्हणाले की, काल, गुरुवारी मुंबईतील रुग्णसंख्या २० हजार पार गेली. यापैकी फक्त ११० लोकं ऑक्सिजन बेडवर गेले आणि ११८० लोकं रुग्णालयात दाखल झाले. २५ हजार बेड्सपैकी फक्त ५ हजार ९९ बेड्स भरले असून ८४ टक्के बेड्स रिकामी आहेत. त्यामुळे ऑक्सिजनचा नगण्य वापर होत आहे. बेड्स रिकामी आहेत. यामुळे मुंबईत सध्या कोणत्याही लॉकडाऊनची गरज नाही.

रुग्णसंख्येच्या आधारावार लॉकडाऊन होऊ शकत नाही

पुढे इकबाल सिंह चहल म्हणाले की, ‘दिनांक ३० डिसेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आमची आढावा बैठक घेतली होती. आता जो ओमिक्रॉनचा धोका निर्माण झाला आहे आणि तिसरी लाट सुरू होत आहे त्यासंदर्भात आता आपण पुढे कशीकशी पाऊले उचलली पाहिजेत. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना लॉकडाऊनचा विचार करण्याची भूमिका मांडली. यावेळी मी सांगितले की, पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचे मापदंड पॉझिटिव्हिटी रेट होता. पण आता मुंबईतले १८६ रुग्णालय, ३५ हजार बेड्स उपलब्ध आहेत. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे निकष पॉझिटिव्हीटी ऐवजी रुग्णालयातील बेड्स आणि ऑक्सिजनचा वापर किती होतोय हे करावेत. सध्या रुग्णांच्या आकड्याला महत्त्व राहिले नसून रुग्णालय, ऑक्सिजनचा वापर, ऑक्सिजन बेड्स ही स्थिती महत्त्वाची आहे. त्यामुळे रुग्णसंख्या कमी असतानाही ऑक्सिजन किंवा आयसीयूचा वापर वाढला तर निर्बंधांचा विचार करू. रुग्णसंख्या कमी जास्त होत असेल तर त्याचा फरक पडत नाही. तसेच रुग्णसंख्येच्या आधारावर लॉकडाऊन होऊ शकत नाही.’


हेही वाचा – corona virus: मुंबईत संपूर्ण नव्हे तर ‘मिनी लॉकडाऊन’ लागणार?, महापौर पेडणेकरांचे संकेत