घरमुंबईरेल्वे तिकिटासाठी CTVM मशीनमध्ये नव्या नोटा चालेनात!

रेल्वे तिकिटासाठी CTVM मशीनमध्ये नव्या नोटा चालेनात!

Subscribe

सीटीव्हीएम मशीनमध्ये जुन्याच नोटांची चलती 

केंद्र सरकारकडून नोटबंदी जाहीर केल्यानंतर काळापैसा रोखण्यासाठी नव्या नोटा चलनात आणल्या. पण आता या नव्या नोटाच चालेनाशा झाल्या आहेत.तेही सरकारी उपक्रमात. यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही.पण हे शंभर टक्के खरं आहे. तिकिटांसाठी प्रवाशांची रांगेत होणारी घुसमट थांबविण्यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे नोटा आणि कॉईन्स वापरुन सीटीव्हीएमच्या मदतीने तिकीट काढण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे. पण या मशीन्समध्ये नव्या नोटा चालत नाहीत. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून या मशिनच कुचकामी ठरल्या आहेत.

रेल्वे तिकीट खिडक्यांवरील प्रवाशांचा भार कमी करण्यासाठी रेल्वेने सीटीव्हीएम मशिन, युटीएस अ‍ॅपसोबत अनेक उपक्रम राबविणे सुरु केले आहे. असाच एक उपक्रम २०१५ मध्य

- Advertisement -

रेल्वे तिकीट खिडक्यांवरील प्रवाशांचा भार कमी करण्यासाठी रेल्वेने सीटीव्हीएम मशिन, युटीएस अ‍ॅपसोबत अनेक उपक्रम राबविणे सुरु केले आहे. असाच एक उपक्रम २०१५ मध्य रेल्वे मंत्रालयाने हाती घेतला होता. त्याअंतर्गत देशभरात ४०० कॅश अ‍ॅण्ड कॉइन ऑपरेटेड तिकीट वेण्डिंग मशिन्सची (सीटीव्हीएम) घोषणा रेल्वे मंत्र्यानी केली होती. मात्र आज या मशिनचा पूर्णपणे बोजवारा उडालेल्या आहेत. ही मशिन १० रुपयांची नवीन नोट स्वीकारत नाही. त्यामुळे रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांना जुन्या नोटा शोधण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. इतके नव्हेतर या मशिनमध्ये तांत्रिक बिघाड होत असल्यामुळे आज या सीटीव्हीएम मशिन्सकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे.

मुंबईच्या मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर सरासरी १८० सीटीव्हीएम मशिन्स बसविण्यात आल्या आहेत. मात्र यापैकी बहुतेक सीटीव्हीएम मशिन बंद आहेत. रेल्वेमंत्र्यानी मोठा गाजावाजा करत २०१५ च्या अर्थसंकल्पात सीटीव्हीएम यंत्रांबाबत घोषणा केली होती. मध्य रेल्वेच्या ४० स्थानकांमध्ये सीटीव्हीएम बसवण्यात आले होते. त्या पाठोपाठ पश्चिम रेल्वेवरसुद्धा ही यंत्रणा बसविण्यात आली होती. आज मध्य रेल्वेवर ११०, तर पश्चिम रेल्वेवर ७० सीटीव्हीएम मशिन्स आहेत. ही सीटीव्हीएम यंत्रे अत्यंत गर्दीच्या अशा सीएसटी, दादर, ठाणे आदी स्थानकांवर लावली आहेत. सीटीव्हीएमवरून तिकीट काढणे प्रवाशांसाठी खूप सोपे असून त्यासाठी कोणत्याही स्मार्ट कार्डची गरज नाही. प्रवाशाने तिकीटाची अचूक रक्कम यंत्रात टाकल्यावर तिकीट मिळते. मात्र या मशिनमध्ये नवीन १० रुपयाची नोट चालत नाही. अशी नोट मशिनमध्ये टाकली असता ती परत येते. मध्य रेल्वेवर काढल्या जाणार्‍या १२ लाख तिकिटांपैकी २.५ लाख तिकिटे सीटीव्हीएमद्वारे काढल्या जातात. उर्वरित तिकिटे जेटीबीएस आणि तिकीट खिडक्यांवरूनच काढली जातात. हा मोठा आकडा आता मोबाइल तिकीट प्रणाली आणि सीटीव्हीएमकडे वळवण्याचा रेल्वेचा प्रयत्न होता. मात्र तो फसल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

एकूण १८० सीटीव्हीएम मशीन 

आज मध्य रेल्वे वर अंदाजे ११० आणि पश्चिम रेल्वे ७० अशा एकूण १८० सीटीव्हीएम मशिन आहेत. यापैकी मध्य रेल्वेच्या मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस, मशिद बंदर, भायखळा, दादर, शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडुप, मुलुंड, ठाणे, कळवा, मुंब्रा, डोंबिवली, कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस, कोपरखैरणे, सानपाडा, वाशी,  बेलापूर, खारघर, पनवेल या स्थानकावर सीटीव्हीएम मशिन्स आहेत. तर पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट, मुंबई सेंट्रल, दादर, अंधेरी, सांताक्रुझ,  बोरीवली, विरार सारख्या मोठ्या रेल्वे स्थानकांवर या मशिन असल्याची माहिती आहे.

रेल्वेच्या सीटीव्हीएम मशिन्समध्ये नवीन नोट घेतली जावी, यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. भविष्यात येणार्‍या सीटीव्हीएम यंत्रामध्ये सुधार करण्यासाठी केंद्रीय स्तरावर निर्णय घेण्यात येतो. 
-उदय बोभाटे, जनरल मॅनेजर, क्रिस मुंबई 

किती स्थानकांवर आहेत या मशीन

मध्य रेल्वे     110
पश्चिम रेल्वे  70

कोणकोणत्या नोटा चालेनात

१००  रुपये
५०    रुपये
२०    रुपये
१०    रुपये
५      रु.चे नाणे
१०    रु.चे नाणे

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -