घरCORONA UPDATECoronavirus: करोनामुळे 108 रुग्णवाहिका आजारी

Coronavirus: करोनामुळे 108 रुग्णवाहिका आजारी

Subscribe

करोनबाधित रुग्णाला सेवा देण्यासाठी कार्यरत असणाऱ्या १०८ रुग्णवाहिकाचे चालक आणि डॉक्टर्स यांचे आरोग्य धोक्यात आहे. त्यांना संरक्षण देणारी पीपीई किड्स हॅन्ड ग्लोज माक्स उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

करोना विषाणू संक्रमण रोखण्यासाठी देशभरात करोना विरोधात लढा देण्यासाठी युद्ध सुरू आहे. त्यातच डॉक्टर, नर्स आणि पोलीस अशा विविध घटकात नागरिक आपलं योगदान देत आहेत. या करोनबाधित रुग्णाला सेवा देण्यासाठी कार्यरत असणाऱ्या १०८ रुग्णवाहिकाचे चालक आणि डॉक्टर्स यांचे आरोग्य धोक्यात आहे. त्यांना संरक्षण देणारी पीपीई किड्स हॅन्ड ग्लोज माक्स उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे १०८ च्या चालकासह डॉक्टर्सना करोना संसर्गाची लागण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

संपूर्ण जगात करोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. तसेच मुंबईसह राज्यात करोनबाधित रुग्णांचा आकडा १५९ वर पोहोचला असून करोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी शासनाने सर्व स्तरातून तयारी केली आहे. तसेच राज्य शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्यावतीने राज्यात सर्वत्र १०८ रुग्णवाहिका आरोग्य सेवेकडे उपलब्ध करून दिले आहे. संपूर्ण राज्यासह मुंबई, पुणे, नागपूर अशा प्रत्येक जिल्ह्यात या १०८ रुग्णवाहिका करोनाबाधित रुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या १०८ रुग्णवाहिकेत एक डॉक्टर आणि एक रुग्णवाहिका चालक असे कार्यरत आहेत. शहरी भागासह ग्रामीण भागातील सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांकरता ही १०८ रुग्णवाहिका यापूर्वी जीवनदायी ठरलेली आहे. त्यामुळे रुग्णाला त्वरित आरोग्यसेवा मिळत आहे. मात्र रुग्णवाहिकाचे चालक आणि रुग्णांची चढ-उतार करण्या संबंधित त्याला रुग्णालयात दाखल करण्याचे महत्त्वाचे कार्य डॉक्टर करत आहे. त्यामुळे रुग्णाच्या संपर्कात या रुग्णवाहिकेचे कर्मचारी येत आहेत. मात्र त्यांना पीपीई किट्स उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोक्यात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पंतप्रधानांचा पुण्यातील नायडू हॉस्पिटलच्या नर्सला कॉल, कामगिरीचे केले कौतुक

महाराष्ट्र शासन गंभीर

सध्या करोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न शासन करत आहे. रुग्णाला रेफर करण्याचे काम रुग्णवाहिकांमधील डॉक्टर आणि चालक करत आहेत. मात्र रुग्णांसाठी असलेल्या मेडिकल किट्स इतर कुठल्याही प्रकारचे संरक्षण साहित्य, टॉयलेट सुविधा डॉक्टरांना पुरवत नाही. म्हणून १०८ रुग्णवाहिका चालक आणि डॉक्टर यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे राज्य शासनाने गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

- Advertisement -

१०८ रुग्णवाहिका डॉक्टर आणि चालक करोनाबाधित रुग्णांना सेवा देत आहेत. मात्र या संसर्गजन्य विषाणुपासून स्वंरक्षणासाठी पीपीई किट्स तसेच इतर कुठल्याही प्रकारचे संरक्षण साहित्य बिव्हिजिकडून १०८ रुग्णवाहिकांच्या डॉक्टरांना पुरवण्यात येत नाही. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आहे. शासनाची या गोष्टीची दखल घ्यावी.
– समीर करबेले, अध्यक्ष, माथाडी श्रमिक कामगार संघर्ष युनियन (महाराष्ट्र)

अनेक रुग्णवाहिकाचे आरोग्य धोक्यात

बीव्हीजी कंपनीकडून राज्यभरात ९३७ रुग्णवाहिका कार्यरत आहे. प्रत्येक रुग्णवाहिकेला महाराष्ट्र शासनाकडून प्रति महिना २ लाख ५२ हजार रुपये देण्यात येतात. मात्र आज बिव्हीजीचा १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेमध्ये ५० टक्के डॉक्टर उपलब्ध नाही. इतकेच नव्हे तर या रुग्णवाहिका सतत नादुरुस्त आहे. यासबंधीत अनेक तक्रारी आरोग्य विभागाला करण्यात आल्या आहे. मात्र यावर शासनाकडून कोणतीही दखल घेतली गेलेली नाही.

पीपीई किट्स म्हणजे काय

१०८ रुग्णसेवा देणाऱ्या चालक आणि डॉक्टरांना संरक्षण म्हणून पुरवण्यात येणाऱ्या पीपीई किट्समध्ये हॅन्ड कॅप, चेहऱ्याला लावण्यात येणारा मास्क, सर्जिकल गाऊन, डिस्पोजल अँप्रॉन, इलॉस्टिक कॅप, हॅन्ड ग्लोज पायाच्या संरक्षणासाठी शु-कव्हर, सेफ्टी ग्लोज, गॉगल, वेस्टेज बॅग या साहित्याचा समावेश असतो. त्यामुळे संपूर्ण शरीराचे संरक्षण होऊ शकते.

करोनाबाधित रुग्णांसाठी मुंबईत ५० टक्के १०८ रुग्णवाहिका सेवा देत आहे. यातील २५ टक्के रुग्णवाहिकेला पीपीई किट्स देण्यात आली आहे. सध्या पीपीई किट्सची मागणी जास्त आहे. त्या उपलब्ध करून देण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे.
– ज्ञानेश्वर शेळके, बी. व्ही. जी कंपनी, सीईओ

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -