घरअर्थसंकल्पीय अधिवेशन 2023निविदा नाहीत, अपात्र कंत्राटदार, निधीचा अपव्यय; कॅग अहवालात मुंबई पालिकेवर ताशेरे

निविदा नाहीत, अपात्र कंत्राटदार, निधीचा अपव्यय; कॅग अहवालात मुंबई पालिकेवर ताशेरे

Subscribe

CAG Report of Mumbai Corporation | हा अहवाल कोविड काळातील असला तरीही कोविड संबंधित खरेदी आणि इतर खर्चाचा यात तपशील नाही. कोविडव्यतिरिक्त खर्चाची यात नोंद आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. 

CAG Report of Mumbai Corporation | मुंबई – मुंबई महापालिकेतील व्यवहारांचा लेखाजोखा मांडणाऱ्या कॅग अहवालातील काही निरिक्षणे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज सभागृहात वाचून दाखवला. भाजपा आमदार अमित साटम यांनी या अहवालातील निरिक्षणे सभागृहासमोर ठेवावीत अशी मागणी केली होती. त्यानुसार, फडणवीसांनी मांडलेल्या निरिक्षणातून कॅगने मुंबई महापालिकेतील गैरव्यवहारावर ताशेरे ओढले असल्याचं स्पष्ट झालं आहे.

कॅग चौकशी करण्याचा आदेश ३१ ऑक्टोबर २०२२ चा आहे. या अहवालात मुंबई महापालिकेतील कामांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. मुंबई पालिकेतील ९ विभागांच्या 12,023.88 कोटी रुपयांचा हा अहवाल आहे. या अहवालात २८ नोव्हेंबर २०१९ ते ३१ ऑक्टोबर २०२२ या कालावधीतील कामांचं निरिक्षण या अहवालात करण्यात आलं आहे. तसंच हा अहवाल कोविड काळातील असला तरीही कोविड संबंधित खरेदी आणि इतर खर्चाचा यात तपशील नाही. कोविडव्यतिरिक्त खर्चाची यात नोंद आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

- Advertisement -

CAG ची महत्त्वाची निरीक्षणे

1. BMC ने 2 विभागांची 20 कामे (214.48 कोटी) टेंडर न काढता दिली.
2. 4755.94 कोटींची कामे एकूण 64 कंत्राटदार आणि BMC यांच्यात करार नसल्याने एक्झिक्युट झाली नाही. करार नसल्याने BMC ला कारवाईचा अधिकार नाही.
3. 3355.57 कोटींच्या 3 विभागांच्या 13 कामांमध्ये थर्ड पार्टी ऑडिटरची नियुक्ती नाही. त्यामुळे कामे कशी झाली, हे पाहणारी यंत्रणा नाही.

- Advertisement -

कॅगने काय म्हंटले?

• पारदर्शकतेचा अभाव
• सिस्टीमॅटिक प्रॉब्लेम
• ढिसाळ नियोजन
• निधीचा निष्काळजीपणे वापर

• दहीसरमधील 32,394.90 चौरस मीटर जागा (बागेचा/ खेळाचे मैदान/ मॅटर्निटी होम यासाठी 1993 च्या डी.पी. प्रमाणे राखीव).
• डिसेंबर 2011 मध्ये अधिग्रहणाचा BMC चा ठराव.
• अंतिम भूसंपादन मूल्यांकन : ₹349.14 कोटी.
• 2011 पेक्षा 716 % अधिक / 206.16. कोटी रू.
• या जागेवर अतिक्रमण.
• आता पुनर्वसनावर आर्थिक भार ₹77.80 कोटी.
• त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता.
• या निधीचा BMC ला कोणताही फायदा नाही.

माहिती तंत्रज्ञान विभाग-BMC
• SAP implementation: ₹159.95 कोटींचा कंत्राट निविदा न मागविताच पूर्वीच्याच कंत्राटदाराला देण्यात आले.
• मे SAP India Ltd. यांना वर्षाकाठी ₹37.68 कोटी मेंटेन्ससाठी दिले. पण या बदल्यात कोणत्याही सेवा नाहीत, हे धडधडीत नुकसान.
• याच SAP कडे कंत्राट, निविदा प्रक्रिया हाताळण्याचे काम.
• 2019 ला फॉरेन्सिक ऑडिट यात मॅन्युपुलेशनला गंभीर वाव – असा अहवाल पण कोणतीच कारवाई त्यावर नाही.

ब्रीज विभाग- BMC
• डॉ. ई मोसेस रोड आणि केशवराव खाडे मार्ग (महालक्ष्मी रेल्वे स्थानक)
• मान्यता नसताना अतिरिक्त कामे
• कंत्राटदाराला BMC कडून अतिरिक्त फेवर
• निविदा अटींचे उल्लंघन करीत ₹27.14 कोटींचे लाभ.
• 16 मार्च, 2022 पर्यंत 50 % काम पूर्ण होणे अपेक्षित असताना केवळ 10 % काम.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
4.3 कि.मी. चे Twin Tunnel.
• वन विभागाची अंतिम मान्यता न घेतल्याने
• जानेवारी 19 पासून ऑगस्ट 2022 पर्यंत किंमत 4500 कोटींकडून 6322 कोटींवर.

परेल टीटी फ्लाय ओव्हर
• 1.65 कोटींचे अतिरिक्त काम निविदा न मागविता
गोपाळकृष्ण गोटवले पूल, अंधेरी
• 9.19 कोटींचे काम विनाटेंडर
• पूल पाडण्यासाठी द्यायचे होते 15.50 कोटी प्रत्यक्षात दिले 17.49 कोटी.

रस्ते आणि वाहतूक
• 56 कामांचा CAG कडून अभ्यास
• 52 पैकी 51 कामे कुठलाही सर्वे न करता निवडली सिमेंट काँक्रीटीकरण
• 54.53 कोटींची कामे निविदा न मागविता जुन्या कामांना जोडण्यात आली.
• M-40 साठी मायक्रो सिलिका हा घटक वापरला जातो. तो बिलात दाखविला जातो. पण 2.40 कोटींचा मायक्रो सिलिका वापरलाच नाही.
• संगणीकृत अहवालात हस्ताक्षराने नोंदी घेण्यात आल्या.
• कंत्राटदारांना 1.26 कोटींचा लाभ देण्यात आला.

आरोग्य विभाग
• KEM हॉस्पीटलमधील अंडर ग्रॅज्युएट/ पोस्ट ग्रॅज्युएट होस्टेल टॉवर बांधकाम जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीविना. त्यामुळे 2.70 कोटींचा दंड.

मिठी नदी प्रदूषण नियंत्रण
• जुलै 2019 मध्ये 4 विविध कामे 4 विविध कंत्राटदारांना/ 24 महिन्यांच्या कालावधीत असा BMC चा निर्णय
• पण प्रत्यक्षात 4 ही कामे एकाच कंत्राटदाराला

मालाड Influent pumping station 
• 464.72 कोटींचे काम अपात्र निविदाधारकाला
• 3 वर्षासाठी अपात्र हे ठावूक असूनही
• Malafide intentions cannot be ruled out. असे CAG चे निरीक्षण

सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट
• जागतिक निविदा- वेस्ट टू एनर्जी 3000 टन / प्रतिदिवस क्षमता.
• ही अट 600 टन / प्रतिदिवस करण्यात आली.
• मे. चेन्नई MSW Pvt. Ltd. ला काम देण्यात आले.
• 648 कोटी रूपयांचे काम
• आतापर्यंत 49.12 कोटींचे पेमेंट
• Poor monitoring by BMC abnormal delays in obtaining the mandatory clearances is likely to have a significant impact on the project delivery schedule.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -