घरCORONA UPDATEकोरोना लस नाही, तर शाळा नाही

कोरोना लस नाही, तर शाळा नाही

Subscribe

‘लस नाही तर शाळा नाही’ आणि ‘शाळा नाही तर शुल्क नाही’ अशी भूमिका राज्यातील पालकांनी बुधवारी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासमोर मांडली.

शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने स्थानिक प्रशासनाकडे सोपवला असला तरी जोपर्यंत कोरोनावर लस नाही, तोपर्यंत शाळा उघडण्याची घाई करू नका असा पवित्रा राज्यातील पालकांनी घेतला आहे. विद्यार्थ्यांना काही झाल्यास जबाबदारी कोणाची असा आक्रमक पवित्रा घेत पालकांनी शाळा सुरू करण्यास विरोध केला. शालेय शुल्क व ऑनलाइन वर्ग घेण्याबाबत पालकांना बर्‍याच समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शाळांकडून ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात येत असल्याने पालकांना शुल्कामध्ये सवलत द्यावी, अशी भूमिका पालकांनी शिक्षणमंत्र्यांकडे व्यक्त केली.

‘लस नाही तर शाळा नाही’ आणि ‘शाळा नाही तर शुल्क नाही’ अशी भूमिका राज्यातील पालकांनी बुधवारी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासमोर मांडली. विद्यार्थ्यांचे जीवन वाचवणे अधिक महत्वाचे आहे. जर विद्यार्थ्यांना काही झाले तर जबाबदारी कोणाची असा प्रश्न पालकांनी शिक्षणमंत्र्यांसमोर उपस्थित केला. वर्गामध्ये तीन फूट अंतर पाळणे, शाळेतील स्वच्छतागृह स्वच्छ नसतात तिथे मुलांच्या आरोग्याची काळजी शाळांकडून कशी घेण्यात येईल, स्कूल बस, व्हॅन आणि ऑटोमध्ये सोशल डिस्टन्सिंग कसे पाळणार असे प्रश्न उपस्थित करत पालकांनी कोरोनावर लस आल्याशिवाय शाळा सुरू करण्यात येऊ नये असा आक्रमक पवित्रा शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासमोर घेतला. त्याचप्रमाणे शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी शासनाने वैद्यकीय तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा असेही मतही पालक संघटना इंडिया वाईड पॅरेंट असोसिएशनकडून मांडण्यात आले. लॉकडाऊन असेपर्यंत शाळांना शुल्क वसूल करण्याची परवानगी देऊ नये. असे निवेदन शिक्षणमंत्र्यांना देताना पालकांनी विनानुदानित खासगी शाळा त्यांच्याकडे असलेल्या अतिरिक्त रक्कमेचा उपयोग करून शाळेचा खर्च भागवू शकतील. ऑनलाईन वर्ग सुरू केल्यास शाळेचे वीज, पाणी व अन्य खर्च वाचणार असल्याचे शुल्कात सवलत द्यावी. कोणत्याही शाळेला लेखापरिक्षण न करता शुल्क घेण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी इंडिया वाईड पॅरेंट असोसिएशनकडून करण्यात आली.

- Advertisement -

ऑनलाईन वर्ग कसे असावेत

सर्व विद्यार्थ्यासाठी विनामूल्य टीव्ही चॅनेलद्वारे दररोज 3-4 व्याख्याने सुरू करावीत. त्यांचे भाग केंद्रीयपणे पूर्ण करावे. ही व्याख्याने त्या विषयाच्या चांगल्या शिक्षकांनी घेतली पाहिजेत. जेणेकरून राज्यभरात सर्व विद्यार्थ्यांना समान शिक्षण मिळेल. सर्व लेक्चर्स रेकॉर्ड करावे आणि वेबसाइटवर उपलब्ध करावीत. यामुळे ऑनलाइन वर्गावर पालकांचा खर्चही कमी होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -