बोरिवली, दहिसरमधील ‘या’ ठिकाणी 10 मे रोजी पाणी नाही

बोरिवली पूर्व मधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासमोर पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या पूर्वेकडील ‘सर्व्हिस रोड’वर 1050 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी बंद करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

बोरिवली ते दहिसर परिसरात काही ठिकाणी 10 मे रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर काही ठिकाणी पाणी कपात करण्यात येणार आहे. बोरिवली पूर्व मधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासमोर पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या पूर्वेकडील ‘सर्व्हिस रोड’वर 1050 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी बंद करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे मंगळवार 10 मे रोजी आर उत्तर विभागातील काही परिसरांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असणार आहे. तर आर मध्य व आर उत्तर विभागातील काही परिसरांमध्ये सकाळी 11:30 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत पाणी कपात करण्यात येणार आहे.  या परिसरातील नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

असे असेल वेळापत्रक

आर मध्य विभाग –  अ) संत ज्ञानेश्वर मार्ग (शांतिवन), श्रीकृष्ण नगर, अभिनव नगर, सावरपाडा, काजुपाडा (सखल पातळी परिसर), ईश्वर नगर, सुदाम नगर, चोगले नगर – सकाळी 8.30 ते 10.45 ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. कामादरम्यान सकाळी 8.30 ते 10 पाणीपुरवठ्याची वेळ.

आर उत्तर विभाग –  ब) ओवरीपाडा (अंशत:), राजेश कुंपण, शांती नगर, अशोकवन (सखल पातळी परिसर), शिव वल्लभ मार्ग (दक्षिण बाजू), संत ज्ञानेश्वर मार्ग, न्यांसी डेपो, चोगले नगर, सावरपाडा, संभाजी नगर, शिव टेकडी, संतोष नगर, गणेश नगर, शुक्ला कुंपण, पांडे नगर – नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – सकाळी 8.30 ते 10.45, कामादरम्यान पाणीपुरवठ्याची वेळ – सकाळी 8.30 ते 10

आर मध्य विभाग –अ) काजुपाडा (उंच पातळी परिसर), माने कंपाऊंड, पाटील कंपाऊंड, जगरदेव कंपाऊंड, ओम सिद्धराज संकुल, गिरीशिखर संकुल, मोठी मजीद परिसर – नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – सकाळी 10.45 ते दुपारी 12.30.  कामादरम्यान पाणीपुरवठ्याची वेळ – सकाळी 10 ते 11.30

आर उत्तर विभाग – ब) अशोक वन (उंच पातळी परिसर), देशमुख रेसिडेन्सी, साईश्रद्धा फेज 1 व 2 – नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – सकाळी 10.45 ते दुपारी 12.30, कामादरम्यान पाणीपुरवठ्याची वेळ – सकाळी 10 ते 11.30

आर उत्तर विभाग –  शिव वल्लभ मार्ग (उत्तर बाजू), मारुती नगर, रावळपाडा, एस. एन. दुबे मार्ग, संत कबीर मार्ग, कोकणीपाडा, धारखाडी, सुहासिनी पावसकर मार्ग, वैशाली नगर, केतकीपाडा (अंशत:), एकता नगर, दहिसर टेलीफोन एक्स्चेंज, घरटनपाडा क्रमांक 1 व 2, संत मिराबाई मार्ग, वाघदेवी नगर, शिवाजी चौक, केशव नगर – नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – सायंकाळी 5.30 ते 7.40,  मात्र, कामादरम्यान पाणीपुरवठा बंद राहील.