अंधेरी आणि विलेपार्लेमध्ये ‘या’ भागात बुधवारी पाणी नाही

भागात पाणीपुरवठा खंडीत करण्यात येईल तर काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येईल

no water supply on Wednesday in the Andheri
अंधेरीत 'या' भागात बुधवारी पाणी नाही

अंधेरी आणि विलेपार्लेमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अंधेरी आणि विलेपार्लेमध्ये ६ ऑक्टोबर सकाळी १० वाजल्यापासून ते ७ ऑक्टोबर सकाळी १० वाजेपर्यंत पाणीपुवठा बंद राहणार असल्याच्या सुचना मुंबई पालिकेकडून देण्यात आल्या आहेत.  के/पूर्व आणि के/ पश्चिम विभागातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा खंडीत करण्यात येईल तर काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येईल. (no water supply on Wednesday 6 october in the Andheri)

मुंबई महानगर पालिकेकडून के/ पूर्व विभागात, जोगेश्वरी( पूर्व) येथे महाकाली गुंफा मार्गावर नंदभवन इंडस्ट्रीजजवळ १२०० मिलीमीटर व्यासाचा वर्सोवा आऊटलेट या जलवाहिनीवरील गळती रोखण्याचे काम हाती घेतले आहे. हे काम ६ ऑक्टोबर सकाळी १० वाजल्यापासून ते ७ ऑक्टोबरला सकाळी १० वाजेपर्यंत केले जाणार आहे. त्यामुळे दोन दिवस अंधेरीत पाणीपुरवठा होणार नाही.

 

‘या’ भागात पाणीपुरवठा खंडित

व्ही.पी.मार्ग, जुहू गल्ली, उपासना गल्ली, स्टेशन रोड,गिल्बर्ट हिल, महाकाली मार्ग, पेपर बॉक्स, मळपा डोंगरी क्रमांक३, शेर-ए-पंजाब, बिंद्रा संकूल, हंजर नगर, गणेश नगर, शोभणा परिसर, तक्षीला मार्ग,पूनम नगर, गोणी नगर, कांतिलाल कंपाऊंड,पी.एम.जी.पी. कॉलनी, बीमा नगर,विशाल हॉल, तेली गल्ली, साईवाजी, एन.एस.फडके मार्ग, ए.के. मार्ग, गुंदवली, विलेपार्ले (पूर्व) भाग, सहार मार्ग,शहाजी राजे मार्ग, हनुमान मार्ग,नेहरु मार्ग,तेजपाल मार्ग,श्रद्धांनंद मार्ग,दयालदास मार्ग,जुहू कोळावाडा (मांगेला वाडी), हिराभाऊ गावडे मार्ग आणि जुहू तारा मार्ग, चार बंगला,डी.एन.नगर, मनीष नगर, मोराहाव (जेव्हीपीडी) (गुलमोहर मार्ग, पार्ला पश्चिम), जेव्हीपीडी आणि मोरागाव,रिलायन्स मोगरा,जुना नागरदास मार्ग,नवीन नागरदास मार्ग,मोगरापाडा.


हेही वाचा – NCB DRUGS आर्यनसाठी सलमान खानची मन्नतवर धाव