घरलोकसभा २०१९ग्राउंड रिपोर्टदत्त पुण्याई पावणार की महा‘जन’मर्जी जिंकवणार ?

दत्त पुण्याई पावणार की महा‘जन’मर्जी जिंकवणार ?

Subscribe

लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपायला आता काहीच काळ राहिला आहे. सोमवारी निवडणुकीच्या महत्त्वाच्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. सहा टप्प्यांत होणारी निवडणुकही राष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवरही महत्त्वाची आहे. मुंबईसाठी चौथ्या टप्प्यात होणार्‍या मतदानात प्रत्येक उमेदवाराची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

कधीकाळी काँग्रेसचा असणारा उत्तर मध्य मतदारसंघ २०१४ ला भाजपाकडे गेला. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप विरुद्घ काँग्रेस अशी लढत रंगली. दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन या सध्याच्या खासदार म्हणून या मतदारसंघात कार्यरत आहे. त्यांच्याविरोधात सुनील दत्त यांची लेक आणि संजय दत्त यांची बहिण प्रिया दत्त या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. २०१४ च्या निवडणुकीत प्रिया दत्त यांना हा गड राखता आला नाही आणि हा मतदारसंघ भाजपच्या गोटात गेला. पण, २०१९ च्या निवडणुकीत हे चित्र कदाचित बदललेले दिसू शकते. मतदार राजा किंवा या मतदारसंघातील जनता पूनम महाजन यांनी केलेल्या कामावर खूष नसून यंदा इथली जनता प्रिया दत्त यांच्या बाजून कौल देऊ शकतील, अशी ही चर्चा आहे.

- Advertisement -

गल्लोगल्ली प्रचार

पूनम महाजन आणि प्रिया दत्त यांच्याकडे प्रचारासाठी आता काहीच तास राहिले आहेत. त्यामुळे, संपूर्ण ताकदीनिशी या दोघीही प्रचाराला लागल्या आहेत. सोसायट्यांमध्ये होणार्‍या छोटेखानी सभांमध्ये पूनम यांच्यासोबत त्यांच्या आई रेखा महाजन सहभागी होत असल्यामुळे त्यांना भक्कम पाठिंबा मिळत आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

- Advertisement -

बहिणीसाठी संजय दत्त मैदानात

उत्तर-मध्य मुंबई मतदार संघातील काँग्रेसच्या उमेदवार आणि माजी खासदार प्रिया दत्त यांचाही सध्या जोरदार प्रचार सुरू आहे. आता प्रिया दत्त यांच्या प्रचारासाठी त्यांचा भाऊ आणि बॉलिवूड अभिनेता संजय दत्त हादेखील मैदानात उतरला आहे. काँग्रेसच्या अनेक रोड शोमध्ये प्रिया दत्त यांच्यासोबत संजय दत्त सहभागी झाले आहेत.

प्रिया दत्त यांची पुन्हा एकदा पूनम महाजन यांच्याशी टक्कर होणार आहे. २००९ मध्ये प्रिया दत्त या मतदार संघातून खासदार झाल्या होत्या. २०१४ च्या निवडणुकीत ही त्या खासदारकीसाठी उभ्या राहिल्या. पण, २०१४ च्या मोदी लाटेत दत्त यांचा पराभव झाला आणि पूनम महाजन या मतदार संघातून निवडून आल्या. महाजन यांना ४ लाख ७८ हजार ५३५ मते मिळाली होती. तर, प्रिया दत्त यांना २ लाख ९१ हजार मते मिळाली. पण, आता मोदी लाटेचा प्रवाह कमी झाल्याने ही निवडणूक पूनम महाजन यांच्यासाठी नक्कीच कठीण जाऊ शकते.

सोशल मीडियावरून प्रचार

राजकारणात सोशल मीडियाचा कसा आणि किती वापर होऊ शकतो याची गणित या दोघींनाही कळल्यामुळे दोघींनीही लोकसभा निवडणुकीसाठी सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर केलेला दिसतो. ट्विटर, फेसबुक , इन्स्टाग्राम आणि इतर सर्वच माध्यमांचा वापर करून मतदान करा यासाठी जनतेला अपील करताना दिसत आहेत. शिवाय, या त्यांच्या अपिलला जनताही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहे.

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -