घरमुंबईआता कॉलेजांच्या कार्यक्रमातही खादीचा पोशाख

आता कॉलेजांच्या कार्यक्रमातही खादीचा पोशाख

Subscribe

विद्यापीठ अनुदान आयोगाची सूचना

कॉलेज व विद्यापीठांमध्ये होणार्‍या विशेष कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी खादीचा पोशाख परिधान करावा, असे परिपत्रक विद्यापीठ अनुदान आयोगाने काढले आहे. त्यामुळे आता यापुढे कॉलेजमध्ये होणार्‍या कार्यक्रमा विद्यार्थी खादीमय झाल्याचे पाहायला मिळेले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारल्यापासून देशात खादीच्या पेहरावाला प्रोत्साहन दिले जात आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाला खादीचे वरदान दिले आहे. स्वातंत्रपूर्व काळामध्ये खादीचा वापर स्वातंत्र्य लढ्यासाठी एक हत्यार म्हणून वापरण्यात आला होता. त्याचबरोबर खादीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगारही उपलब्ध होतो. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी व खादी उद्योगाला प्रोत्साहन मिळावे यासाठी देशातील कॉलेजांमध्ये आता साजर्‍या होणार्‍या कार्यक्रमांमध्ये खादीचा पोशाख असावा अशी सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने केली आहे. देशातील विद्यापीठांमध्ये यापूर्वी दीक्षांत समारंभासाठी खादीचा वापर व्हावा अशी सूचना देण्यात आली होती.

- Advertisement -

आता देशातील सुमारे ५० हजार कॉलेजांनाही त्यांच्या कार्यक्रमांमध्ये तसेच स्नेहसंमेलनांमध्ये खादीचा पेहराव करावा असे परिपत्रक आयोगाने काढले आहे. या परिपत्रकानुसार कॉलेजांनी आता विद्यार्थ्यांना खादी किंवा हॅण्डलूमचा पोशाख करावा लागणार आहे. यानुसार कॉलेजांनी तरतूद करावी अशी सूचनाही या परिपत्रकात करण्यात आली आहे. या परिपत्रकात कॉलेजांना सक्ती केल्याचे नमूद नसले तरी देखील आयोगाचे परिपत्रकाचे पालन करणे कॉलेजांना बंधनकारक आहे.

यामुळे आता लवकरच कॉलेजांच्या कार्यक्रमात रंगीबेरंगी पोशाखाच्या ऐवजी खादीचे वेगवेगळे रंग पाहवयास मिळणार आहे. खादीच्या कपडे परिधान केल्याने विद्यार्थ्यांमध्ये भारतीय असल्याचा अभिमान निर्माण करण्याबरोबरच खादीचे कपडे हे उष्ण व थंड वातावरणात विद्यार्थ्यांसाठी आरामदायी असणार असल्याचे परिपत्रकामध्ये म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -