घरमुंबईएनआरसी- कॅब विरोधात मुंब्र्यात कडकडीत बंद

एनआरसी- कॅब विरोधात मुंब्र्यात कडकडीत बंद

Subscribe

एनआरसी आणि कॅब विरोधात देशभरात वातावरण संतप्त झाले आहे. ठिकठिकाणी आंदोलने, निषेध मार्च निघत असतानाच बुधवारी मुंब्रा परिसरात जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला. मुंब्र्यात निषेधार्थ कडकडीत बंद ठेवण्यात आला होता. तर भव्य असा ५० हजाराचा जमाव रस्त्यावर उतरला होता. दरम्यान पोलिसांनी मात्र कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला. एनआरसी आणि कॅब विरोधात मुंब्र्यात कडाडून विरोध करीत न्यायालयीन लढाई आणि निषेध आंदोलने सुरूच राहणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. सदर निषेध कुल जमात मुंब्रा या नोंपॉलिटिकल संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
सुधारित नागरीकत्व बिल वरून उठलेले वादळ शमण्याचे नावच घेत नाहीये त्यातच जामिया विश्वविद्यालयात विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसी अत्याचाराने संपूर्ण देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून या विधेयकाला विरोध होत असून मुस्लिम संघटना आक्रमक झालेल्या दिसत आहेत. आज मुंब्र्यात देखील मुस्लीम समाज या विधेयकाला विरोध दर्शवत रस्त्यावर उतरला. सरकारचा निषेध व्यक्त करत त्यांनी सरकारला धारेवर धरले. मुंब्र्यातील हजारो नागरिक आज रस्त्यावर उतरले होते व त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा देत ४० ते ५० हजाराचा लॉंग मार्च काढला. हातात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो असलेले फलक घेऊन सरकारच्या नागरीसंशोधन बिलाच्या विरोधात मुंब्रावासीयांनी आगीची गरळ ओकली. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा निषेध नोंदविला. तर तब्बल ५० हजाराच्या आसपास रस्त्यावर उतरलेले मुस्लिम बांधव यामुळे पोलिसांनी चोख आणि प्रचंड बंदोबस्त ठेवला होता. बिलाच्या संधार्भात आम्ही न्यायालयीन लढाई लढू व जो पर्यंत बिल रद्द होत नाही तो पर्यंत असाच विरोध मुस्लीन समाजाकडून करण्यात येईल असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. ही विरोध रॅली शिमला पार्क ते मुब्रा स्थानकापर्यंत काढण्यात आली होती.

मुंब्र्यात निषेध आणि कडकडीत बंद

बुधवारी सकाळ पासूनच गजबजलेला मुंब्रा परिसरात स्मशानशांतता होती. सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. एकही दुकान मुंब्र्यात उघडे नव्हते. मुंब्रा स्टेशन ते शिळफाटा पर्यंत सर्वच दुकाने कडकडीत बंद ठेवण्यात अली होती. तर तब्बल ५० हजार मुंब्रावासी रस्त्यावर उतरल्याने मुंब्य्रात एनआरसी आणि कॅबबाबत तीव्र विरोध दर्शविला. सरकारचा निषेधही नोंदविण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -