घरताज्या घडामोडीठाणे जिल्ह्यात कोरोनाचा कहर! जाणून घ्या रुग्णांची आजची आकडेवारी

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा कहर! जाणून घ्या रुग्णांची आजची आकडेवारी

Subscribe

ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तर सध्या ठाणे जिल्ह्यात २७ हजार ४७९ रुग्णांवर उपचार सुरु असून आतापर्यंत ९११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तर सध्या ठाणे जिल्ह्यात २७ हजार ४७९ रुग्णांवर उपचार सुरु असून आतापर्यंत ९११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ९३ हजार ५०७ संशयितांपैकी ६५ हजार ८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १३ हजार १९१ अॅक्टिव्ह रुग्ण असून आतापर्यंत १३ हजार ३७७ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

ठाणे शहरात आतापर्यंत ३ हजार ४७२ रुग्ण आढळून आले असून ३ हजार ७१६ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून २६८ जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

तर कल्याण डोंबिवलीत २ हजार ६७८ अॅक्टिव्ह रुग्ण असून आतापर्यंत २ हजार ९९ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ९६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईची आकडेवारी

नवी मुंबईत २ हजार ३६५ अॅक्टिव्ह रुग्ण असून ३ हजार २९४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर १९४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर मिरा-भाईंदरमध्ये १ हजार १४६ अॅक्टिव्ह रुग्ण असून १ हजार ५८० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर १२९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. उल्हासनगरमध्ये ७६३ अॅक्टिव्ह रुग्ण असून ६६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ३९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

भिवंडी शहरात ९८५ अॅक्टिव्ह रुग्ण असून आतापर्यंत ५०९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ९४ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तसेच अंबरनाथमध्ये ७८३ अॅक्टिव्ह रुग्ण असून ६७६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ठाणे ग्रामीण भागात ६७३ अॅक्टिव्ह रुग्ण असून आतापर्यंत ५१८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ३९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ठाण्यात कोरोना रोखण्यासाठी वेगाने रुग्ण आणि संपर्क शोधा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेश दिले आहेत.

हेही वाचा – रंगांधळेपण असलेल्यांनाही आता वाहन चालक परवाना मिळणार  


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -