घरताज्या घडामोडीमुंबईत गोवर रुग्णसंख्या १८४; संशयित रुग्णसंख्या १,२६३

मुंबईत गोवर रुग्णसंख्या १८४; संशयित रुग्णसंख्या १,२६३

Subscribe

मुंबईमध्ये गेल्या दोन महिन्यात आठ ठिकाणी गोवरचा प्रादुर्भाव वाढला आहे. बुधवारपर्यंत गोवर रुग्णांची संख्या १८४ एवढी झाली आहे. संशयित रुग्णांची संख्या १,२६३ एवढी नोंदविण्यात आली आहे.

मुंबई : मुंबईमध्ये गेल्या दोन महिन्यात आठ ठिकाणी गोवरचा प्रादुर्भाव वाढला आहे. बुधवारपर्यंत गोवर रुग्णांची संख्या १८४ एवढी झाली आहे. संशयित रुग्णांची संख्या १,२६३ एवढी नोंदविण्यात आली आहे. तर गोवर बाधित ७ रुग्णांचा संशयित मृत्यू झाला आहे. गोवरच्या आजाराने मुंबईकर चिंतातुर झाले आहेत. पालिका आरोग्य खाते चांगलेच कामाला लागले आहेत. (Number of measles cases in Mumbai is 184 Number of suspected cases 1263)

मिळालेल्या माहितीनुसार, गोवरचा वाढता प्रादुर्भाव पाहता पालिकेने कस्तुरबा रुग्णालयात विशेष कक्षाची स्थापना केली आहे. सध्या या रुग्णालयात यशस्वी उपाचारानंतर २९ रुग्णांना घरी पाठविण्यात आले आहे. तर ८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ४ रुग्ण ऑक्सीजनवर आहेत. तर १ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे, अशी माहिती पालिका आरोग्य खात्याकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

१ ते ४ वर्ष वयोगटातील ८७ रुग्ण

गोवर बाधित १८४ रुग्णांमध्ये, ० ते ८ महिन्याचे २५ रुग्ण, ९ ते ११ महिन्याचे २८ रुग्ण, १ ते ४ वर्ष ८७ रुग्ण, ५ ते ९ वर्षे ३० रुग्ण , १० ते १४ वर्षे १० रुग्ण, १५ आणि त्यावरील वयोगटातील ४ रुग्णांचा समावेश आहे. तसेच, ताप व पुरळ आलेले १,२६३ संशयित रुग्ण आहेत. त्यामध्ये, ० ते ८ महिन्याचे १५७ रुग्ण, ९ ते ११ महिने १६६ रुग्ण, १ ते ४ वर्ष ६४७ रुग्ण, ५ ते ९ वर्षे २१७ रुग्ण, १० ते १४ वर्षे ६० रुग्ण, १५ आणि त्यावरील वयोगटातील १६ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत अतिरिक्त सत्रात ११ हजार ८१० मुलांचे आणि गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – तुमची ‘मन की बात’ ऐकण्यासाठी आलोय; राहुल गांधींचा मोदींना अप्रत्यक्ष टोला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -