घरताज्या घडामोडीमुंबई मनपा ओबीसी आरक्षण सोडतीत दिग्गजांना दणका, ६३ प्रभाग ओबीसी आरक्षित

मुंबई मनपा ओबीसी आरक्षण सोडतीत दिग्गजांना दणका, ६३ प्रभाग ओबीसी आरक्षित

Subscribe

शिवसेनेचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा वॉर्ड ओबीसी महिला आरक्षित झाला आहे. वॉर्ड क्र. ९६ हा ओबीसी आरक्षित झाला आहे. परंतु त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका पूजा महाडेश्वर यांना वॉर्डमधून संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. या आरक्षण सोडतीमध्ये दिग्गज नेत्यांना मोठा दणका बसला आहे. नव्याने ओबीसी आणि महिला सर्वसाधारण वर्गांसाठी आरक्षण काढण्यात आले असून यापूर्वी जे सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण प्रवर्गांचे आरक्षण रद्द करण्यात आले आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्यात येणार आहेत. राज्यातील एससी आणि एसटी प्रवर्गाचे आरक्षण वगळता ओबीसी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यामध्ये २३६ पैकी २१९ प्रभागांची आरक्षण लॉटरी काढण्यात आली. यामधील एकूण ६३ प्रभाग ओबीसी आरक्षित झाले असून यातील ५३ प्रभागात मागील तीन वर्षांमध्ये कधीच ओबीसी आरक्षण नसल्यामुळे नियमानुसार ते वॉर्ड ओबीसी आरक्षित होणार आहेत.

- Advertisement -

या दिग्गजांना धक्का

मुंबई महानगरपालिकेमधील शिवसेना नेते आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधवांनासुद्धा या आरक्षण सोडतीमध्ये दणका बसला आहे. त्यांचा वॉर्ड आरक्षित झाला असून ओबीसी महिला आरक्षित झाला आहे.

शिवसेनेचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा वॉर्ड ओबीसी महिला आरक्षित झाला आहे. वॉर्ड क्र. ९६ हा ओबीसी आरक्षित झाला आहे. परंतु त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका पूजा महाडेश्वर यांना वॉर्डमधून संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

- Advertisement -

या सोडतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसलासुद्धा धक्का बसला आहे. गटनेत्या असलेल्या राखी जाधव यांचा १३० हा वॉर्ड ओबीसी आरक्षित झाला आहे. त्यामुळे त्यांना दुसरा वॉर्ड शोधावा लागणार आहे.

शिवसेनेला सर्वाधिक धक्का बसला असल्याचे दिसत आहे. माजी सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांचा १८५ हा वॉर्ड ओबीसी महिला आरक्षित झाला असल्यामुळे त्यांनासुध्दा दुसरा वॉर्ड शोधावा लागणार आहे. त्यांचा वॉर्ड यापूर्वी ओपनमध्ये होता.

ओबीसींसाठी निश्चित करण्यात आलेले वॉर्ड

ओबीसी आरक्षणासाठी १० वॉर्डांसाठी लॉटरी काढण्यात आली. यामध्ये १७, ८२, ९६, ७३, १६, १२७, ९८, ६१, १७३, १३० हे वॉर्ड आहेत. तसेच ज्या वॉर्डमध्ये गेल्या तीन वर्षांपासून ओबीसी आरक्षण नव्हते ते वॉर्ड ३,७, ९, १२, १३, २७, ३०, ३८, ४०, ४२, ४८, ५१, ५३, ६२, ७६, ७९, ८१, ८७, ८९, १०१, ११०, ११७, १२८, १२९, १३२, १३५, १३७, १४६, १४७, १४८, १५०,१५२, १५४, १५५, १५९, १६१, १६४, १७४, १७९, १८०, १८३, १८५, १८८, १९५, २००, २०२, २०३, २१७,२१८, २२२,२२३, २३०, २३६ हे वॉर्ड ओबीसींसाठी निश्चित करण्यात आले आहेत.


हेही वाचा : मुलाचे आडनाव ठरवण्याचा आईलाच अधिकार, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -