Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Odisha Train Accident : लेकीचा हट्ट पुरवला अन्... कटकला जाणाऱ्या बाप-मुलीची हृदयस्पर्शी...

Odisha Train Accident : लेकीचा हट्ट पुरवला अन्… कटकला जाणाऱ्या बाप-मुलीची हृदयस्पर्शी कथा

Subscribe

नवी दिल्ली : ओडिशातील बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी तीन ट्रेनचा भीषण अपघात (Odisha Train Accident) झाला. या अपघातात 280हून अधिक प्रवाशांनी आपला जीव गमावला. तर 900हून अधिक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पण या भीषण अपघातातून जे सुदैवाने बचावले, ते परमेश्वराचे आभार मानत आहेत. पण यातील बाप-लेकीची एक हृदयस्पर्शी कहाणी देखील आता समोर आली आहे.

ओडिशात शुक्रवारी झालेल्या भीषण रेल्वे दुर्घटनेतील कोरोमंडल एक्स्प्रेस आपला नियोजित ट्रॅक बदलून पर्यायी मार्गिकेमध्ये (loop line) गेली आणि त्यानंतर बहानगर बाजार स्थानकाच्या पुढे मुख्य मार्गाऐवजी तेथे उभ्या असलेल्या मालगाडीला जाऊन धडकली. यामुळे कोरोमंडल एक्स्प्रेसचे डबे बाजूच्या रुळांवर कोसळले. याचवेळी त्या दुसऱ्या मार्गावरून जाणाऱ्या बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस ही गाडी कोरोमंडल एक्सप्रेसच्या बोगींना धडकले, असे रेल्वे मंडळाच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. यात 288 जणांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

खडकपूर येथून आपल्या 8 वर्षीय मुलीसह देब (Deb) नावाची व्यक्ती कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये चढली. मुलीच्या डाव्या हाताला गळू झाले होते, त्यामुळे शनिवारी (3 जून) त्या दोघांची एका डॉक्टरकडे अपॉइंटमेंट होती, त्यामुळे ते कटकला जात होते. देब यांनी थर्ड एसी कोचचे तिकीट घेतले होते. परंतु त्यांच्या मुलीला खिडकीची जागा (window seat) हवी होती. त्यासाठी तिने हट्ट धरला. त्यामुळे त्यांनी ट्रेनमधील तिकीट तपासनीसला (TC) विनंती केली. तेव्हा त्याने गाडीत खिडकीची जागा रिकामी नाही. त्यामुळे तुम्ही सहप्रवाशांना विनंती करा, तुम्हाला कोणीतरी सीट बदलून देईल, असा सल्ला दिला.

त्यानुसार त्यांनी विनंती केल्यानंतर दुसऱ्या डब्यातील दोघांनी जागांची अदलाबदल करण्याची तयारी दर्शवली. त्यांचा डबा सोडून तिसऱ्या डब्यात हे दोन सहप्रवासी होते. त्यांनी जागांची अदलाबदल केली आणि काही वेळातच ही दुर्घटना घडली. यांच्या डब्याचे फारसे नुकसान झाले नाही. तसेच, त्यांना किरकोळ दुखापत झाली. पण त्यांचा आधीचा डबा चिरला गेला आणि त्यात अनेकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. सीटची अदलाबदल केल्याने बाप आणि लेक हे सुदैवाने बचावले.

- Advertisement -

त्या दोन सहप्रवाशांचे काय झाले, हे माहीत नाही. ते देखील सुखरूप असावेत, अशी देवाकडे प्रार्थना करतो. नशीब बलवत्तर म्हणून आम्ही बचावलो, त्यासाठी परमेश्वराचे खूप आभार, असे देब म्हणाले.

- Advertisment -