घरमुंबईशहापूर जलसंधारण विभागाचे कार्यालय की भंगाराचे गोडाऊन!

शहापूर जलसंधारण विभागाचे कार्यालय की भंगाराचे गोडाऊन!

Subscribe

राज्य शासनाच्या जलसंधारण विभागाच्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील भातसा वसाहतीजवळ असलेल्या कार्यालयाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. एका पडझड झालेल्या आणि मोडकळीस आलेल्या धोकादायक अशा खोल्यांमध्ये शासकीय कर्मचार्‍यांना जीव मुठीत घेऊन येथे काम करावे लागत असल्याचे धक्कादायक वास्तव पहायला मिळत आहे. कार्यालयाच्या झालेल्या या दुरवस्थेकडे मात्र वरिष्ठ अधिकार्‍यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.

राज्य शासनाच्या लघु पाटबंधारे विभागाचे स्थानिकस्तर तसेच जलसंधारण विभाग ही दोन महत्त्वाची कार्यालये शहापूर भातसा कालवा विभागाच्या आवारात अगदी अडगळीत झाडी-झुडपे वाढलेल्या ठिकाणी थाटली आहेत. प्रचंड पडझड झालेल्या खोल्यांमध्ये गेली अनेक वर्ष या दोन्ही सरकारी कार्यालयांचा कारभार सुरू आहे. या कार्यालयांच्या अंतर्गत दरवर्षी तालुक्यात सरकारच्या जलशिवार योजनेची आणि जलसंधारण विभागाची लाखो रुपयांची लहान मोठ्या सिमेंट बंधार्‍यांची कामे केली जातात. असे असतानादेखील लाखो रुपयांची कामे करणार्‍या या जलसंधारण विभागाच्या सरकारी कार्यालयाची अवस्था मात्र येथील दुर्दशेमुळे बिकट झाली आहे. ही दोन्ही सरकारी कार्यालये महत्त्वाची असून त्याला भंगाराचे गोडाऊन असल्यासारखे वापरले जात आहे. कार्यालयाच्या देखभाल दुरुस्तीकडे कमालीचे दुर्लक्ष झाल्याचे या कार्यालयाच्या झालेल्या दैनावस्थेमुळे लक्षात येते की पावसाळ्याच्या मोसमात तर हे कार्यालय कधी कोसळेल हे सांगता येत नाही. या कार्यालयात उंदीर-घुशींचा वावर दिसतो. अनेकदा सापदेखील येथे दिसून आल्याचे कर्मचारी सांगतात. कार्यालयाच्या दैनावस्थेबाबत येथील अभियंत्यांना विचारले असता कार्यालयाच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणाचा प्रस्ताव कळवा येथील जलसंधारणाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवल्याचे येथील अभियंत्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -