मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे कार्यालय राहणार ठाकरे गटाकडेच; पण..

संसदेतील शिवसेना कार्यालय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात गेले आहे. पण मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेचे कार्यालय हे उद्धव ठाकरे गटाच्याच ताब्यात ठेवण्यात आले आहे. पण या कार्यालयाच्या बाहेर असलेल्या धनुष्यबाण चिन्हाला झाकण्यात आले आहे.

office of Shiv Sena in Mumbai Municipal Corporation will be with the Thackeray group

संसदेतील शिवसेना कार्यालय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात गेले आहे. पण मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेचे कार्यालय हे उद्धव ठाकरे गटाच्याच ताब्यात ठेवण्यात आले आहे. पण या कार्यालयाच्या बाहेर असलेल्या धनुष्यबाण चिन्हाला झाकण्यात आले आहे.

मुंबई महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करता यावी, अशी सर्वच राजकीय पक्षांची इच्छा असते. यासाठी अनेक राजकीय पक्षांमध्ये चढाओढ देखील होत असते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्यानंतर त्यांना खरी शिवसेना अशी ओळख मिळाली आहे. संसदेत असलेल्या शिवसेना कार्यालयाचे चित्र जरी बदललेले पाहायला मिळत असले तरी मुंबई महानगरपालिकेतील शिवसेना कार्यालयाची स्थिती वेगळी आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात असणाऱ्या शिवसेनेच्या कार्यालयावर निवडणूक आयोगाचा निर्णय येण्याआधी शिंदेंच्या शिवसेनेकडून हक्क सांगण्यात आला होता. परंतु ठाकरे गट आणि शिंदे यांच्यामध्ये वाद होऊ नये यासाठी या कार्यालयाला बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाकडून घेण्यात आला होता. पण आता ठाकरे गटाकडे सर्वाधिक नगरसेवक असल्याने हे कार्यालय ठाकरे गटाकडेच राहणार असल्याचे दिसून येत आहे.

शिवसेना पक्षाचे सर्व हक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळत असले तरी, महापालिकेतील शिवसेनेच्या कार्यालयावर ते आपला हक्क सांगू शकत नाही. कारण यासाठी त्यांच्याकडे पुरेशी नगरसेवक संख्या असणे गरजेचे आहे. पण असे नसल्याने अद्याप तरी या महापालिकेतील या कार्यालयावर ठाकरे गटाचाच ताबा आहे. परंतु हे कार्यालय ठाकरे गटाकडे असले तरी या कार्यालयाच्या बाहेर असलेले धनुष्यबाण हे चिन्ह झाकण्यात आले आहे. तर शिवसेना हे नाव तसेच ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा – निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर संसदेतील शिवसेना कार्यालयाचे चित्र बदलले

दरम्यान, शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेच्या अनेक गोष्टींवर त्यांच्याकडून दावा करण्यात आला. त्यावेळी त्यांनी महापालिकेतील शिवसेनेच्या कार्यालयावर देखील दावा केला होता. पण यामुळे कोणताही वाद होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाने शिवसेनेचे कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता, याचसोबत भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची कार्यालये देखील महापालिका प्रशासनाकडून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.