देशमुखांना तुरुंगात पाठवणारे अधिकारी घेतायत अनिल परबांच्या बंगल्याची झडती

Officials who sent Anil Deshmukh to jail are going to search Anil Parba's bungalow
देशमुखांना तुरूंगात पाठवणारे अधिकारी घेतायत अनिल परबांच्या बंगल्याची झडती

शिवसेना नेते अनिल परब यांच्याविरोधात ईडी(ED) कारवाई सुरू केली आहे.ईडीने आज (गुरूवारी) सकाळी मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्याशी संबंधीत 7 ठिकाणांवर छापे टाकले. यात शासकीय निवासस्थान, वांद्रे येथील घराचा समावेश आहे. ईडी अधिकाऱ्यांचे पथक सकाळी सीआरपीएफ जवानांसह शिवालय या बंगल्यावर दाखल झाले आहेत. या पथकात सहाय्यक संचालक तासीन सुलतान यांचा समावेश आहे.

हेही वाचा –  अनिल परब यांनी म्हाडाची जमीन बळकावली; सोमय्यांची लोकायुक्तांकडे तक्रार

देशमुखांना तुरूंगात पाठवणारे अधिकारी करणार चौकशी? –

तासीन सुलतान हेच अनिल देशमुख प्रकरणातील तपासाधिकारी होते. देशमुखांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात तुरूंगात पाठवण्यात तासीन सुलतान यांची महत्वाची भूमिका होती. सूत्रांच्या माहितीनुसार तासीन सुलतान अनिल परब यांची चौकशी करू शकतात.

मुंबई, पुणे आणि दापोलीत ईडीचे छापे –

ईडीने अनिल परब यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहाराचा (Money Laundering) गुन्हाही दाखल केला आहे. कोणतेही ठोस पुरावे हाती लागल्याशिवाय ईडी (ED) संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करत नाही. त्यामुळे अनिल परबांच्या विरोधात ईडीच्या हाती ठोस पुरावे लागले असावेत, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे ईडीकडून अनिल परब यांना अटक केली जाणार का, हे पाहावे लागेल. ईडीने शासकीय निवास्थान शिवालय आणि वांद्रे येथील खासगी निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर छापा टाकला आहे. मुंबई, पुणे आणि दापोली परिसरात हे छापे टाकण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

हेही वाचा – Ed Raids : अनिल परबांसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरी ईडीची धाड, ‘IT’ने केली होती छापेमारी

किरीट सोमय्यांची टीका –

अनिल परब यांच्यावर झालेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. निल देशमुख, नवाब मलिक आणि आता अनिल परब यांचा नंबर लागला आहे. परब यांनी शेकडो कोटींचा घोटाळा केला आहे. परब यांचे सर्व काळे कारनामे बाहेर येतील. आता त्यांनी बॅग भरायला घ्यावी, असा सूचक इशारा किरीट सोमय्या यांनी दिला.

पोलीस बंदोबस्तात वाढ –

दरम्यान वांद्रेतील घराबाहेर शिवसैनीक जमन्यास सुरूवात झाली आहे. यामुळे पोलीसांनी अनिल परब यांच्या घराबाहेरचा बंदोबस्त वाढवला आहे.