घरट्रेंडिंगकरोनामुळे छेडले 'ऑईल' वॉर

करोनामुळे छेडले ‘ऑईल’ वॉर

Subscribe

अमेरिकेवर दबाव आणण्यासाठी हे ऑईल वॉर मर्यादित कालावधीचे असेल असा तज्ञांचा अंदाज आहे

करोनाचा फटका आता कच्च्या तेलाच्या उत्पादनावरही जाणवू लागला आहे. जगातील सर्वात मोठा तेल निर्यात करणारा करणाऱ्या सौदी अरेबियाने रशियाला धडा शिकवण्यासाठी तेलाच्या क्षेत्रात युद्ध पुकारले आहे. कच्च्या तेलातील दुसऱ्या क्रमांकाचा देश असलेल्या रशियाला शिक्षेच्या माध्यमातून ओपेक संघटनेलाही ही मोठी चपराक असल्याचे बोलले जात आहे. तेल उप्तादन करणाऱ्या १४ देशांची संघटना असणाऱ्या ओपेकने करोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी कच्च्या तेलाचे उत्पादन कमी करून किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणूनच सौदी अरेबियाने १९९१ नंतरची ही सर्वात मोठी कपात जाहीर केली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किंमतीत २० टक्के घट झाली आहे. २०१६ नंतरची ही सर्वात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. सौदी अरेबियाने तेलाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणत घट केल्यानेच ही मोठी घसरण पहायला मिळत आहे. रूस आणि ओपेक देश (१४ देशांची संघटना) यांच्यात सुरू असलेल्या स्पर्धेमुळे या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात घसरल्या आहेत.

- Advertisement -

आतापर्यंत ओपेक राष्ट्रांनी आणि आणखी कच्च्या तेल निर्मितीतील देशआंनी करोन व्हायरसच्या परिणामामुळे झालेल्या आर्थिक संकटातून सावरण्यासाठीच्या केलेल्या उपाययोजनांना पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू होता. पण सौदी अरेबिया आणि रशियातले हे तेलाचे युद्ध टॅक्टिकल आणि मर्यादित कालावधीचे असेल असा तज्ञांचा दावा आहे. या तेल युद्धाच्या माध्यमातून अमेरिकेवर शेल इंधनाच्या उत्पादनावर दबाव आणण्यासाठीचा हा एक प्रयत्न असल्याचेही बोलले जात आहे.

जगभरात करोना व्हायरसमुळे मुळातच तेलाच्या मागणीवर परिणाम झाला आहे. त्यामुळेच कच्च्या तेलाच्या किंमती खाली असल्याचे बोलले जात आहे. तेल निर्यात करणाऱ्या देशांची संघटना ओपेकच्या माध्यमातून जगभरात उद्भवलेल्या करोना व्हायरसच्या परिस्थिवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीच ओपेक देशांचा पाठिंबा मिळवण्यासाठीची खटपट सुरू आहे. याचा परिणाम म्हणूनच आंतरराष्ट्रीय बाजारात तेल युद्ध सुरू झाले आहे. याचा परिणाम म्हणूनच आखाती देशांमध्ये रविवारी तेलाच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. चीनमध्ये कमकुवत होत चाललेल्या अर्थव्यवस्थेत ही कच्च्या तेलाच्या किंमतीतील घसरण सर्वात मोठी अशी नोंदविण्यात आली आहे. सौदी अरेबियाने गेल्या २० वर्षातील सर्वात मोठी अशी कच्च्या तेलाच्या किंमतीतील कपात केली आहे. एप्रिल महिन्यासाठी कच्च्या तेलाच्या डिलिव्हरीची किंमत ४-६ डॉलर प्रति बॅरल कमी करण्यात आली आहे. तर अमेरिकेसाठी ही ७ अरब डॉलर प्रति बॅरल कमी केली आहे. सौदी अरेबियातील सर्वात मोठी कंपनी अरैमको ही आपले अरेबियन लाईट तेल १०.२५ डॉलर प्रति बैरल या किंमतीने युरोपला विकत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -