Breaking: नरिमन पॉईंट येथील ‘बँक ऑफ बहरीन आणि कुवैत’ इमारतीला आग!

nariman point, fire

सकाळी मुंबईच्या नरिमन पॉईंटजवळील ‘बँक ऑफ बहरीन आणि कुवैत’ येथे भीषण आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत व बचावकार्य सुरू आहे. सकाळची वेळ असल्याने बँक बंद होती, त्यामुळे कोणतीही जीवीतहानी झाली नाही. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. बँकेचे शटर बंद होते, त्यामुळे नुकसानीचा अंदाज बांधणे कठीण आहे.