घरCORONA UPDATEराज ठाकरे यांच्या घरात कोरोनाची एन्ट्री, घरकाम करणाऱ्या नोकराची टेस्ट पॉझिटिव्ह!

राज ठाकरे यांच्या घरात कोरोनाची एन्ट्री, घरकाम करणाऱ्या नोकराची टेस्ट पॉझिटिव्ह!

Subscribe

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेले कृष्णकुंजवर पुन्हा एकदा कोरोनानं धडक दिली आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकांपैकी तीन जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होती. आता राज ठाकरे यांच्या दोन्ही वाहनचालकांना कोरोनाची लागण झाली आहे आहे. या दोघांनाही उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आता राज ठाकरे यांच्या घरी कामाला येणाऱ्या नोकरासह आणखी एकाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे.

घरात काम करणाऱ्या दोन जणांचा कोराना तपासणीचा अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. यातील एक हा राज ठाकरे यांच्या घरी घरकाम करत होता. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.  याआधी राज ठाकरे यांच्या दोन वाहन चालक, दोन सुरक्षा रक्षकांनादेखील कोरोनाची लागण झाली होती. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

- Advertisement -

तर या आधी सुध्दा कोरोनाने कुष्णकुंजवर एन्ट्री घेतली होती. राज ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाला होता. मात्र, हे तिन्ही पोलिस करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. नुकतंच या सुरक्षा रक्षकांनी करोनावर यशस्वी मात करत करोनाविरुद्धची लढाई जिंकली आहे. त्यानंतर राज ठाकरे यांच्या वाहनचालकाला कोरोनाची लागण झाल्यामुळे चिंतेत वाढ झाली असतानाच. राज ठाकरे यांच्या घर कामासाठी येणाऱ्या नोकराला कोरोनाची लागण झाल्यामुळे चिंतेत आणखीनच भर पडली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -